‘अवेंजर्स’ मध्ये तापसी पन्नूला साकारायचीय ‘ही’ भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमध्ये प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका साकारणारी अभिनेत्री तापसी पन्नू आता लवकरच चित्रपट ‘मिशन मंगल’ मध्ये एक इसरो साइंटिस्टच्या रोलमध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त चित्रपट ‘सांड़ की आंख’ मध्ये ८० वर्षाची शार्पशूटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. तापसीला अजून एक भूमिका साकरण्याची इच्छा आहे. जी एक सुपरहिरोईनची आहे.

नुकतेच अभिनेत्री तापसी पन्नूने सांगितले की, ती मार्वल सिनेमॅटिक यूनिवर्सची ‘अवेंजर्स’ चित्रपटामध्ये इंडियन सुपरहिरोईनची भूमिका साकारणार आहे. तिला अवेंजर्स चित्रपट खूप आवडतात आणि ती अशी अपेक्षा करते की, करिअरमध्ये तिला सुपरहिरोईनची भूमिका साकारण्याची संधी मिळेल.

ती म्हणाली की, ‘मला अपेक्षा आहे की, अवेंजर्स मध्ये मला सुपरहिरोईनची भूमिका साकारण्याची संधी मिळेल. मला वाटते की, ही अशी भूमिका आहे जी मी आजपर्यंत साकारली नाही. मला चित्रपटात कोणत्याच भूमिकेला रिप्लेस करायचे नाही. पण मला एक इंडियन सुपरहिरोईनची भूमिका साकारण्याची इच्छा आहे. ‘

तापसी पुढे म्हणाली कि, ‘मला आयरन-मॅन वर खूप क्रश आहे. ज्याला रॉबर्ट डाउनी साकारत आहे. ‘अवेंजर्स: एंडगेम’ मध्ये आयरन-मॅनची भूमिका संपली होती तेव्हा मी थिएटरमध्ये रडायला लागले होते. ती खूप दुःखी होती. त्याचबरोबर ‘आर्टिकल 15′ मध्ये आयुष्मान खुरानाची भुमिका ही मला साकारायची आहे.’

तापसीच्या कामाबद्दल बोलायचे म्हणले तर तिने अनुभव सिन्हाचा चित्रपट साइन केली आहे ज्याची शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. ‘मुल्क’ नंतर अनुभवसोबत तापसीचा हा दुसरा चित्रपट असेल. याव्यतिरिक्त तापसी तमिळ अॅक्शन चित्रपटामध्ये देखील काम करत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –