पोलीस निरीक्षकाच्या निलंबनासाठी वारकऱ्यांचा मोर्चा

गंगाखेड : पोलीसनामा ऑनलाईन – परभणीत वारकरी आणि पोलिसांमधील वाद विकोपाला गेला आहे. पोलीस निरीक्षकांविरोधात मोर्चा काढणाऱ्या ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेडमध्ये पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी रात्री दहाच्या सुमारास कीर्तन बंद केले होते. त्या निषेधार्थ वारकऱ्यांनी आज (गुरुवार) तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी माछरे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.

गंगाखेड येथील राणीसावरगाव रोड दत्तमंदिर परिसरात सप्ताहाचे कार्यक्रम सुरू असताना गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी धुडगूस घालत कार्यक्रम बंद करण्याची धमकी दिली. या घटनेचा निषेध म्हणून आज वारकऱ्यांनी मोर्चा काढला.

गंगाखेड येथील राणीसावरगाव रोड दत्तमंदिर परिसरातील भगवान महाराज सातपुते इसादकर यांनी आठ दिवस सप्ताह, कथा, ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले होते. २४ ते ३० जानेवारीपर्यंत हा सप्ताह साजरा होणार होता. पण सप्ताहाच्या दुसऱ्याच दिवशी २५ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ह.भ.प. गिरगावकर यांचे किर्तन चालू असतांनाच गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे व इतर चार कर्मचारी सप्ताहास्थळी येऊन सप्ताह बंद करा, रात्रीची वेळ झाली. नाहीतर तुमच्यावर महाराजांवर गुन्हे दाखल करू. अशी धमकी देत माछरे यांनी सप्ताहात धुडघुस घालुन सप्ताह बंद पाडला. याच्या निषेधार्थ गंगाखेडात आज सकाळी संतजनाबाई मंदिरापासून मेनरोड मार्ग शांततेत मार्चा काढून तहसीलदार यांना निवेदन दिले. या मोर्चात हजारो महाराज, नागरीकासह खासदार व सर्वपक्षीय नेते सामिल झाले होते.

शुक्रवारी (दि.२५) ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर यांचे किर्तन सुरू असतांना रात्री साडेनऊच्या सुमारास गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे व इतर चार कर्मच्याऱ्यांनी कार्यक्रम बंद करा, नसता तुमच्यावर गुन्हे दाखल करुन सामान जप्त करु तुम्हाला परवानगी दिली कोणी अशी धमकी देऊन मद्यधुंद अवस्थेत येऊन धुडगुस घालुन सप्ताह बंद पाडला. महाराजांसोबत हुज्जत घातली. या कारणावरुन पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांच्यासह चार पोलीस कर्मच्याऱ्यांवर कारवाई करुन निलंबीत करण्यात यावेत या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते व महिला सहभागी झाले होते. निवेदन दिल्यानंतर अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत पोलीस निरीक्षक यांच्यासह चार पोलीस कर्मच्याऱ्यावर कारवाई करुन निलंबीत करण्यात यावे अथवा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.

काँग्रेसने पोटनिवडणुकीत केला भाजपचा पराभव ; आमदाराचे केले शतक
आधार कार्ड हरवलंय ? NO TENSION करू शकाल रिप्रिन्ट, या आहेत सोप्या स्टेप्स