शूटींगच्या सेटवरच सनी लिओनीचे मस्ती, Video व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुड अभिनेत्री सनी लिओनीचे जगभरात अनेक चाहते आहेत. पण, भारतात तिच्या चाहत्यांची संख्या थोडी जास्तच आहे. कारण गुगलच्या भारताच्या सर्च लिस्टमध्ये ती कायम आघाडीवर असते. लॉकडाउनच्या काळात ती पती आणि मुलांसमवेत अमेरिकेत होती. त्यानंतर आता सनी मुंबईत परतली असून सध्या ती शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सनी लिओनी नुकतीच शूटिंगच्या सेटवर बरीच मस्ती करताना दिसून आली आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सनी या व्हिडिओमध्ये स्टीलच्या प्लेट आणि हातात हंडा घेऊन डान्स करताना दिसते आहे. हा व्हिडिओ पाहून सनी तिचे काम एन्जॉय करताना दिसून येत आहे. सनीने हा व्हिडीओ शेअर करताना तीने लिहले आहे की, ‘मस्ती ऑन द सेट्स. सनी लिओनीने तिच्या पुढच्या ‘अनामिका’ सिनेमाची घोषणा केली होती. हा सिनेमा दिग्दर्शक विक्रम भट्ट बनवणार आहेत. यात सनीसोबत सोनाली सहगल मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाशिवाय सनी लिओनीकडेही काही दक्षिण चित्रपट आहेत. आता चाहते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सनी लिओनला पाहण्याची आतुरतेने वाट पाहतील.

सनी लिओनी शेवटची नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अथिया शेट्टीसोबत 2019 मध्ये ‘मोतीचूर चकनाचूर’ चित्रपटात दिसली होती. या सिनेमात त्याने एक कॅमिओ केला होता. सनीने ‘जिस्म 2’ बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.