कुस्तीच्या आखाड्यात भज्जीची थप्पड पडताच ‘पोलिसवाला’ गारद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाचा ऑफ स्पिनर हरभजन सिंग क्रिकेटच्या मैदानावर पराक्रम गाजवताना तुम्ही अनेकदा पहिले असेल पण भज्जी कुस्तीच्या मैदानात देखील हिरो ठरला. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मागील आठवड्यात WWE कुस्तीपटू द ग्रेट खलीच्या अकादमीत हरभजन सिंग पोहचला त्याने थेट आपली ताकद दाखवत हरभजनने पोलीस कर्मचाऱ्याचा गणवेश परिधान केलेल्या एका कुस्तीपटूला अशी काही थप्पड लगावली की, तो थेट रिंगणाबाहेरच जाऊन कोसळला.

हरभजन सिंगनेसोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो द ग्रेट खलीच्या जालंधर येथील अकादमीत गेल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत पोलिसांचा गणवेश परिधान केलेला एक कुस्तीपटू भज्जीला आव्हान देतो.
https://www.instagram.com/accounts/login/?next=%2Fp%2FBtaA62Wlgxc%2F&source=follow
त्यानंतर ३८ वर्षीय हरभजन रिंगणात उतरतो आणि आव्हान देणाऱ्या त्या कुस्तीपटूच्या गालात एकच थप्पड लगावतो. भज्जीची थप्पड गालावर पडताचतो कुस्तीपटू रिंगणाबाहेर जाऊन कोसळतो. घडलेल्या प्रकाराचा त्या कुस्तीपटूला खूपच राग येतो असे दिसते. हरभजन देखील आपला माइक वेगळ्याच स्टाइलने रिंगणात भिरकावून देतो.

भारतासाठी १०३ कसोटी सामन्यांमध्ये ४१७ बळी घेतलेला हरभजन सिंग सध्या संघाबाहेर आहे. तो आपल्या कारकिर्दितील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना संयुक्त अरब अमीरातीविरुद्ध मार्च २०१६मध्ये ढाका येथे खेळला. हा टी-२० सामना होता.