नेर ग्रामस्थाचा अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरापाञेत सोडण्यासाठी दोन तास महामार्ग रोकून धरला

ADV

धुळे : पाेलीसनामा ऑनलाईन  ( विजय डोंगरे )- धुळे तालूक्यातील नेर गावाजवळील अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरा पाञात सोडवावे. यासाठी अगोदर ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देऊन मागणी केली होती.या मागणीचा विचार होत नाही हे पाहता.आज मंगळवारी सकाळी नेर जवळील म्हसदी फाटा सुरत – नागपूर महामार्गावर सगळ्यांच पक्षातील पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुर केले.

पाणी पांझरापाञात सोडा. नाही तर खुर्च्या खाली करा. प्रशासनाचा धिक्कार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. जिल्ह्यात दुष्काळ व पाणी समस्या जास्त भेडसावत आहे. शेतीला पाणी नाही. पिण्याचे पाण्याचे हाल. शेतीला काही पाणी पाटाद्वारे मिळेल. पिकांना जिवनदान मिळेल नाही तर नुकसान होईल यासाठी संतप्त ग्रामस्थांनी दोन तास पाण्यासाठी महामार्ग रोकून धरला.

ADV

महामार्ग ठप्प झाल्याचे कळताच तालूका पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे व अन्य फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला. ग्रामस्थांना समजविण्याचे प्रयत्न केले. संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाचा जवाबदार अधिकारी बोलवा, कलेक्टरांना बोलवा अशी मागणी केली. वसावे यांनी हि बाब वरिष्ठांना कळविली. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधत ग्रामिण तहसिलदार अमोल मोरे यांना रास्तो करणारे ग्रामस्थांशी संवाद साधुन कळविले. तहसिलदार मोरे हे तात्काळ म्हसदी फाट्याजवळ सुरु असलेल्या रास्ता रोको येथे पोहचले. संतप्त ग्रामस्थांनी पांझरापाञात आत्ता पाणी सोडा आम्ही रास्ता रोको मागे घेतो अशी भुमिका घेतली. मोरे यांनी ग्रामस्थांना मी आपल्या सोबत आहे. आपल्या मागणीला न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्या नंतर रास्ता रोको ग्रामस्थांनी मागे घेतला.

आता मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत