Watermelon Peel Benefits : कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही फेकू नका बाहेरचा भाग, दूर होऊ शकतात ‘या’ समस्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम : उन्हाळ्यात मार्केटमध्ये कलिंगड मोठ्या प्रमाणात विक्रीला येतात. याच्या सेवनाने शरीर हायड्रेट राहते. परंतु लोक आतील लाल भाग खाऊन बाहेरचा भाग फेकून देतात. कलिंगडाच्या सालीत अनेक पोषकतत्व असतात. याचे फायदे जाणून घेवूयात…

1 फायबर भरपूर असते –
कलिंगडाच्या सालीत फायबरची मात्रा जास्त असते. फायबरमुळे ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. शौचालाही साफ होते.

2 वेटलॉससाठी लाभदायक –
कलिंगडाच्या सालीतील फायबर वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते. याचे सलाड बनवून खाऊ शकता. कॅलरी खुप कमी असल्याने मेटाबॉलिज्म वाढते.

3 झोपेत सुधारणा –
जर झोपेची समस्या असेल तर कलिंगडाच्या सालीचा वापर करावा. यामध्ये मॅग्नेशियम असल्याने झोप चांगली लागते.

4 सुरकुत्या ठिक होतात –
कलिंगडाच्या सालीत लायकोपीन, फ्लेवोनोईड आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असते. यामुळे काळे डाग, सुरकुत्या आणि वयाच्या खुणा कमी करते. ही साल त्वचेवर रगडल्याने आपली त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.