‘आपल्या आरक्षणावर, हक्कावर गदा येत असेल तर लढावेच लागेल’ : छगन भुजबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील महाविकास आघाडी सरकार असो वा यापूर्वीचे फडणवीस सरकार आम्ही मराठा आरक्षणाला कधी विरोध केला नाही. मात्र मराठा समाजातील काही नेते म्हणताहेत की मराठयांना ओबीसींमधून आरक्षण द्यावे, त्यासाठी ते न्यायालयात देखील गेले आहेत . अशावेळी ओबीसी समाजाला जागृत करणे आमचे काम आहे. ते आम्ही करत आहोत, असे मत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Minister of Food, Civil Supplies Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले आहे. पुण्यात छगन भुजबळ यांच्या हस्ते डॉ. तात्याराव लहाने यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी भुजबळ बोलत होते.

भुजबळ म्हणाले, आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल तर लढावेच लागेल. महात्मा फुलेंनी आपल्याला लढायला शिकवले. त्यासाठीची प्रेरणा आज इथून घेऊन जायचे आहे. जातीसाठी राजकारणासाठी भांडण केली जातात त्यातून बाहेर पडणार की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच दगडूशेठ गणपती 10 हजार महिला अथर्वशीर्ष म्हणतात पण एकाही बाईला जिच्यामुळे ही शक्ती मिळाली त्या सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत जाऊन हे कराव असे वाटत नाही, असेही भुजबळ यावेळी म्हणाले. पंतप्रधान येताहेत त्यांचे स्वागत आहे. मुख्यमंत्री किंवा आणखी कोणी त्यांच्या स्वागताला का नाहीत ते त्यांना विचारायला हवे.

भ्रमात राहू नका. डॉ. लहाने.
कोरोना होणार नाही.. या भ्रमात राहू नका तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. यासाठी मास्क परिधान करण आवश्यक आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार का ? असे सातत्याने विचारले जाते. जगात आली आहे मग आपल्याकडे देखील येऊ शकते. काळजी घेतली तर ती सौम्य प्रमाणात येईल. जानेवारी मार्च मध्ये येईल असे म्हटले जात पण ती येणे आपल्या हातात आहे. लस निश्चित येणार आहे ती किती काळ आपल्या शरीरात राहील यासाठी अँटीबॉडीज चा अभ्यास सुरू आहे. लस घेतल्यानंतर बूस्टर घ्यावे लागेल असे ते म्हणाले.