काय सांगता ! होय, 5 वर्षात भारतीयांची ‘संपत्ती’ होणार ‘दुप्पट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कार्वी इंडिया वेल्थ 2019 हा अहवाल भारतासाठी आशेचा किरण घेऊन आला आहे. येत्या 5 वर्षांत भारतीयांची संपत्ती दुप्पटीने वाढेल असा अंदाज या अहवालात आहे. हा अहवाल जागतिक भूक निर्देशांकांत भारताची खालवलेली कामगिरी, पायाभूत क्षेत्रातील घटलेले उत्पादन या नकारात्मक बाबींच्या पार्श्वभूमीवर असतो. या अहवालानुसार भारतीयांची संपत्ती 5.27 लाख कोटी रुपयांवर पोहचेल. सध्या ही संपत्ती 2.62 लाख कोटी आहे. ही माहिती कार्वी प्रायव्हेट वेल्थचे सीईओ अभिजित भावे यांनी दिली.

गेल्या काही वर्षापासून भारतीय शेअर बाजारात थेट गुंतवणूक करण्याचे धोरण अवलंबले आहे. यामुळे शेअर बाजाराबरोबर गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कार्वीच्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत 2019 मध्ये भारतीयांच्या संपत्तीमध्ये 9.32 टक्क्यांनी वाढ होऊन ती 430 लाख कोटी रुपयांवर पोहचली. या वाढीचे मुख्य कारण फायनान्शिअल अ‍ॅसेटमध्ये झालेली वाढ आहे. याशिवाय भारतीयांच्या फिजिकल अ‍ॅसेटमध्ये 7.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच 2025 पर्यंत बॉम्बे स्टॉक मार्केटचा निर्देशांक एक लाख अंकांवर जाण्याची शक्यता आहे.

मागील पाच वर्षांमध्ये फायनान्शियल अ‍ॅसेटचे प्रमाण 57.25 टक्क्यांवरून 60.95 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. कार्वीच्या अहवालानुसार त्यापैकी 6.39 टक्के गुंतवणूक थेट इक्विटीमध्ये आहेत. त्यामुळे इक्विटी हा गुंतवणुकीचा सर्वांत लोकप्रिय पर्याय असल्याचे दिसत आहे. मागील वर्षभरात फिजिकल अ‍ॅसेटमध्ये 7.59 टक्क्यांची वाढ झाली असून त्यामध्ये सोने आणि रिअल इस्टेट मिळून हे प्रमाण 92.57 टक्क्यांवर पोहोचले. फिजिकल अ‍ॅसेटमधील एकूण संपत्ती 167 लाख कोटींवर गेल्याचेही कार्वीने अहवालात नमूद केले.

अब्जाधिशांची संख्या घटली, संपत्ती मात्र वाढली
या अहवालानुसार देशात श्रीमंती वाढली असून श्रीमंताच्या संख्येत मात्र घट झाली आहे. 2018 साली श्रीमंतांच्या वाढीचा दर 9.32 टक्क्यांवर असल्याचे म्हटले जाते जो एक वर्षापूर्वी 13.45 टक्के होता. अब्जाधीशांची भारतातील संख्या 2018 साली 2.56 लाख होती. तर 2017 साली 2.63 टक्के होती. देशातील अब्जाधीश शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करतात असे देखील अहवालात नोंद आहे. 2018 साली देशातील श्रीमंतांची एकूण संख्या 430 लाख कोटी रुपयांवर पोहचली. हीच संपत्ती 2017 साली 392 लाख कोटी रुपयांवर होती.

शेअर बाजारच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक वाढत असताना मुदत ठेवीमधील गुंतवणूक वाढ होताना दिसले. 2018 पर्यंतची मुदत ठेवीतील गुंतवणूक 8.85 टक्क्यांच्या वाढीने 45 लाख कोटी रुपयांवर पोहचली.

80 लाख कोटीचे सोने
भारतात सोन्याची मोठी आयात होते. देशात सोन्याच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. मार्च 2019 पर्यंत 80.94 लाख कोटी रुपयांची सोन्यात गुंतवणूक झाली. तर रिअल इस्टेटमध्ये 74 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचे दिसले.

अब्जाधीशांची संपत्ती 

2.56 लाख – अब्जाधीशांची एकूण संख्या

430 लाख कोटी – अब्जाधीशांची एकूण संपत्ती

262 लाख कोटी – एकूण वित्तीय संपत्ती

168 लाख कोटी – एकूण स्थावर संपत्ती

52 लाख कोटी – इक्विटीमधील गुंतवणूक

45 लाख कोटी – मुदत ठेवींतील गुंतवणूक

34 लाख कोटी – विम्यामधील गुंतवणूक

34 लाख कोटी – बँकेमधील एकूण जमा रक्कम

(स्रोत – कार्वी इंडिया वेल्थ अहवाल 2019)

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या