Weather Alert ! सातारा, महाबळेश्वरमध्ये गारपिटीची दाट शक्यता, सांगली अन् कोल्हापूरला ‘हायअलर्ट’

सातारा : ऑनलाइन टीम – राज्याच्या विविध भागांत गेल्या अनेक दिवसांपासून गारपीटीसह जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज पुन्हा सातारा आणि महाबळेश्वर येथे जोरदार वाऱ्यासह गारपीट आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

महाबळेश्वर आणि सातारा या ठिकाणी काळे ढग दाटून आले असून पुढील काही तासात सातारा, सांगली, महाबळेश्वर, कोल्हापूर याठिकाणी अवकाळी पाऊस पडणार आहे. या ठिकाणी जोरदार वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आपली योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या लगतच्या भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती सध्या निर्माण झालेली आहे. यामुळे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळत आहे. याचे प्रामाण काही ठिकाणी जास्त आहे तर काही ठिकाणी अधिक आहे. पुढील तीन दिवस म्हणजे 7 मे पर्यंत राज्यात अवकाळी पावसाची स्थिती काय राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 7 मे नंतर पुढील एक आठवडा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून शुक्रवार पासून राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासाह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.