यंदाचा पाऊस कसा असेल? हवामान विभागानं दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  अनेक दिवसापासून महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी अवकाळी पाऊसाने धुमाकूळ घातला आहे. आधीच कोरोनाचे संकट असतानाच त्यात हे एक दुसरं संकट शेतकऱ्यांपुढे निर्माण झालं आहे. तर मान्सून बाबत हवामान विभागाने शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक माहिती दिली आहे. यंदाचा पावसाळी हंगामात देशात चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने केला आहे. या कारणाने पिकाचे उत्पादन करण्यास शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात मान्सूनचा पाऊस पडतो. गेल्या ३ वर्षांपासून देशात पावसाची स्थिती सामान्य स्वरूपात आहे. यंदाही स्थिती कायम राहणार असून ९६ ते १०४ टक्के इतका पाऊस पडणार आहे. ९६ ते १०४ टक्के दरम्यानचा पाऊस हा आपल्या भारतात सामान्य पाऊस मानला जातो. यावर्षी देशात दुष्काळाची शक्यता नाही, तसेच, देशात ६५ टक्के लोकसंख्या अजूनही शेतीशी संबंधित व्यवसाय करतात. यामधें अनेक शेतकरी मान्सूनच्या पावसावर शेती करतात. कोरोनाच्या संकटाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी कृषी क्षेत्र अधिक मोलाचं ठरणार आहे. यावर्षीचा मान्सूनबाबतचा दुसरा अहवाल मे महिन्यात जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर देशातील मान्सून स्थिती आणखी स्पष्ट होऊ शकणार आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

या दरम्यान, यावर्षी जूनपासून सुरू होणारा नैऋत्य मान्सूनमध्ये दीर्घ-कालावधी सरासरीच्या १०३ टक्के सामान्य राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची शक्यता नसल्याचंही या संस्थेनं स्पष्ट केलं होतं. भारतीय हवामान खात्याच्या या नव्या अहवालामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे स्कायमेटनं आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं. हा हवामान विभागाचा अंदाज महत्वपूर्ण समजला जात आहे.