Weather Updates : मान्सून पूर्व पावसाला सुरूवात, पुढील दोन दिवस देशाच्या ‘या’ भागात होईल गर्जनेसह पाऊस, जाणून घ्या IMD चे ताजे अपडेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसात देशाच्या अनेक महत्वाच्या ठिकाणी जोरदार पाऊस झाला. देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये सुद्धा हवामानात बदल दिसून आला. आता, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) पुन्हा एकदा देशाच्या अनेक महत्वाच्या राज्यांसाठी आणि प्रदेशांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 ते 48 तासादरम्यान पूर्वोत्तर राज्यात अनेक ठिकाणी थांबून-थांबून पाऊस होण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे पुढील 24 तासादरम्यान पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसाच्या काही भागात हलका पाऊस होऊ शकतो.

तर, स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासादरम्यान उत्तर भारतात पर्वतीय क्षेत्रात सुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पर्वतांमध्ये पावसाची हालचाल आजपासून पुन्हा वाढेल आणि येथे पाऊस 17 मार्चपर्यंत सक्रिय राहील. 16 आणि 17 मार्चला पंजाब, हरियाणा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि या कालावधी दरम्यान मध्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत मान्सून पूर्व पाऊस दिसू शकतो.

स्कायेमेट वेदर रिपोर्टनुसार नवीन पश्चिमी हालचाल उत्तर पाकिस्तान आणि त्या लगतच्या जम्मू काश्मीरच्या जवळपास दिसत आहे, ज्याचा परिणाम मैदानी परिसरात सुद्धा दिसत आहे.

मध्य प्रदेशच्या या भागात पावसाची शक्यता
तर, मध्यप्रदेशच्या काही भागातसुद्धा हलका पाऊस नोंदला गेला आहे. आयएमडीच्या भोपाळ केंद्राने सांगितले की, ग्वाल्हेर, चंबळ, जबलपुर, भोपाळ, होशंगाबाद आणि सागर विभागातील विविध ठिकाणांवर सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे.

देशाच्या या भागात सुरु झाला प्री-मान्सून पाऊस
स्कायमेटनुसार भारतात पावसाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी विविध भागामध्ये प्री-मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. या प्री-मान्सून हालचाली मार्च-एप्रिल आणि मे च्या दरम्यान जारी राहतात. प्री-मान्सून सीझनमध्ये तीन महिन्यांच्या दरम्यान, गडगडाट, वीज चमकणे, गारा पडणे अशा अनेक हालचाली होण्याची शक्यता असते. यासोबतच देशाच्या पूर्व आणि पूर्वोत्तर राज्यांच्या काही ठिकाणी, जिथे हवामान खुपच उग्र रूप धारण करते.

या दरम्यान मार्चचा पहिला पंधरवडा सरत असताना देशाच्या विविध भागात प्री-मॉन्सूनचा पाऊस दिसून आला आहे. नुकतेच राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, दिल्ली-एनसीआर आणि दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडुच्या काही भागात हलके वादळ आणि गडगडाटासह पाऊस झाला आहे. तर काही भागात पाऊस मोठ्या प्रमाणात सुद्धा झाला आहे.