‘या’ दिवशी ऑनलाईन रिलीज होणार विद्या बालनचा ‘शकुंतला देवी’ !

पोलीसनामा ऑनलाइन –  लॉकडाऊनमुळं सारं काही ठप्प आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सिनेमा हॉलही बंद आहेत. अनेक सिनेमांची रिलीज लटकली आहे. अशात आता मेकर्स ऑनलाईन रिलीजकडे वळत आहेत. अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना स्टारर गुलाबो सिताबो हा सिनेमा देखील अ‍ॅमेझॉन प्राईवर रिलीज झाला आहे. अशात आता विद्या बालन हिचा शकुंतला देवी हा सिनेमा आता अ‍ॅमेझॉन प्राईमवर रिलीजसाठी तयार आहे. एका रिपोर्टनुसार, हा सिनेमा आता 31 जुलै 2020 रोजी होण्याची शक्यता आहे. परंतु अद्याप कास्ट किंवा डायरेक्टरनं याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

शकुंतला देवी हगा सिनेमा आधी 8 मे 2020 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळं सध्या सारं काही ठप्प आहे. त्यामुळं शकुंतला देवी सिनेमाची रिलीजही लटकली होती. विद्या बालननं घोषणा केली होती की, सिनेमा ऑनलाईन रिलीज होणार आहे. तिनं एक पोस्टरही शेअर केलं होतं परंतु यात रिलीज डेट कुठेही सांगण्यात आलेली नव्हती. आता हा सिनेमा 31 जुलै रोजी रिलीज होत आहे. तरीही चाहत्यांना वाट पहावी लागणार आहे.

विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एनटीआरच्या बायोपिकमध्ये एनटीआरच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच बसवतारकम नंदमुरी ही भूमिका साकारणार आहे. यासाठी तिनं वजनही वाढवलं आहे. याशिवाय ती शकुंतला देवी या बायोपिक सिनेमातही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती अक्षय कुमार सोबत मिशन मंगल या सिनेमात दिसली होती. 15 ऑगस्ट 2019 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.