WB Election : भाजपाची बंगालमध्ये ‘डबल’ फजिती, तिकीट न मागताच उमेदवारी दिल्याने दोघांनी नाकारली

कोलकाता : पोलीसनामा ऑनलाईन –   पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी 157 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र यातील दोन उमेदवारांनी भाजपने जाहीर केलेली उमेदवारी नाकारुन पक्षाची फजिती केली आहे. दरम्यान भाजपाच्या या डबल फजितीमुळे तृणमूल खासदार महुआ मित्रा यांनी ट्विट करून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच टोला लगावला आहे. खाकी निकरमध्येही गुडघे दिसतात. भाजपाने 2 आठवड्यानंतर अखेर बंगालमधील उमेदवारांची घोषणा केली. या यादीत ज्यांचे नाव आहे, ते भाजपाचे सदस्य नाहीत. त्यानी भाजपाकडे तिकीटही मागितले नाही. मिस्टर शहा, तुम्हाला गृहपाठ करण्याची गरज आहे, असा टोला लगावला आहे.

भाजपने जाहीर केलेल्या यादीत दोन उमेदवारांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. यात चौरंगी विधानसभा मतदारसंघातून भाजपाने दिवगंत खासदार सोमन मित्रा यांच्या पत्नी शिखा मित्रा यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी मी निवडणूक लढवणार नाही. माझ्या परवानगी शिवाय नावाची घोषणा केली आहे. मी भाजपामध्ये कधीही प्रवेश करणार नाही. भाजपाच्या यादीत माझे नाव कसे आले हे मला माहिती नाही. मी काँग्रेसमध्ये आहे आणि काँग्रेसलाच साथ देईन, मित्रा यांनी स्पष्ट केले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या आमदार माला साहा यांचे पती तरुण साहा यांना भाजपाने काशीपूर-बेलगछिया मतदारसंघातून तिकीट दिले होते. त्यांनी देखील उमेदवारी नाकारली आहे. याबाबत आपण भाजपाला कल्पना दिली होती, असे तरुण यांनी स्पष्ट केले.