रेल्वेत केंद्रीय मंत्र्यासह प्रवाशांना मिळाले सडलेले अन्‍न, जाणून घ्या नेमका काय आहे प्रकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील हायस्पीड रेल्वे वंदे भारतमधील कर्मचाऱ्यांकडून मोठी बेजबाबदारपणा समोर आला आहे. कानपूरवरून नवी दिल्लीला जाताना एक्झिकेटीव क्लासमधील प्रवाशांना जे अन्न देण्यात आले ते सडलेले असल्याचे समोर आले.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी अन्न तपासणी न करताच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना देखील देण्यात आले. यामुळे केंद्रीय मंत्रांसह अन्य प्रवासांनी देखील या संबंधित तक्रार दाखल केली आहे. याची तक्रार रेल्वे मंत्रालयापर्यंत जाणार आहे. नेहमी कौतूक करण्यात येणाऱ्या वंदे भारत या रेल्वेत हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

बंद डब्यातून देण्यात येणाऱ्या अन्नातून येत होता दुर्गंध –

प्रवाशांना बंद डब्यातील अन्न देण्यात आल्यानंतर डबा उघडताच सडलेल्या अन्नाचा दुर्गंध सुटला. पनीर आणि पराठ्याचा दुर्गंध येत होता तर भात कच्चाच होता. एक्झिकेटीव क्लास 1 ने प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांना बंद डब्यातून अन्न देण्यात आले तर त्याचा दुर्गंध येत होता. एवढेच नाही तर इतर प्रवाशांना नंतर डब्बे देण्यात आले तेव्हा सुद्धा असाच प्रकार घडला.

जेव्हा हेच अन्न रेल्वेने प्रवास करणाऱ्या केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना देखील देण्यात आले, तेव्हा त्यांना त्या डब्यातून दुर्गंध येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे राग आलेल्या केंद्रीय मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना झाडझाड झाडले आणि लेखी तक्रार दाखल करण्यास लावली. त्यानंतर सर्वांनी लेखी तक्रार दाखल केली.

आरोग्य विषयक वृत्त –

हे दोन पदार्थ टाळा ; अन्यथा ‘स्नायू’ होतील कमजोर

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

केसांच्या समस्या समूळ नष्ट करा ; ‘हे’ आहेत उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like