… म्हणून ‘या’ महिला खासदारानं जन्मलेल्या मुलीचं नावं ठेवलं ‘कोरोना’

कोलकाता : वृत्त संस्था –  देशावर कोरोना संसर्गाचे संकट असताना तृणमूल काँग्रेसच्या एका महिला खासदाराने मुलीला जन्म दिला आहे. यामध्ये मजेशीर गोष्ट अशी की, या मुलीच नाव ‘कोरोना’ असं ठेवण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यात जन्मलेल्या या मुलीचं नाव उपनाव (Nickname) कोरोना असं ठेवलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार असलेल्या अपरूपा पोद्दार आई झाल्या आहे. खासदार अपरूपा पोद्दार या दुसऱ्यां वेळेस आरामबाग या मतदार संघातून निवडून आल्या आहे. एकीकडे जग कोरोना संसर्गाशी लढत असताना या मुलीचा जन्म झाल्यामुळे त्यांनी व त्यांचा नवरा मोहम्मद झाकीर अली यांनी तिचं उपनाव ‘कोरोना’ ठेवलं आहे.

दरम्यान, अपरूपा यांचा नवरा मोहम्मद झाकीर अली हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या मुलीच नाव ठेवण्याची विनंती करणार आहे. यात विशेष म्हणजे अपरूपा यांची देखील दोन नाव आहेत. त्या आफ्रिन अली तसेच अपरूपा पोद्दार या नावांनी देखील ओळखल्या जातात. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी अशा प्रकारची प्रथा आहे की, जन्मलेल्या बाळाला पहिल्यांदा उपनाव दिल जात. आणि त्यांनतर घरातील वरिष्ठ मंडळींकडून त्यांचं अधिकृत नाव ठेवलं जात.

तसंच याप्रकारे नाव ठेवण्याची भारतातील ही पहिली घटना नाही. यापूर्वी मध्यप्रदेश मधील एका दाम्पत्याने त्यांच्या मुलाचं नाव ‘लॉकडाऊन’ ठेवलं आहे. आणखी एक अशीच घटना म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये एका दाम्पत्याने त्यांच्या मुलाचं नाव चक्क ‘सॅनिटायझर’ ठेवलं आहे.