WB Elections : भाजपने महिला नेत्यांचे पोस्टर केले जारी, म्हणाले – ‘पश्चिम बंगालमध्ये बुआ नहीं बेटी चाहिए’

कोलकाता : वृत्तसंस्था – देशातील पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा काल (शुक्रवार) झाली. त्यानंतर आता पश्चिम बंगालमध्ये ‘बुआ आणि बेटी’ या मुद्यावरून राजकारण सुरु आहे. पश्चिम बंगाल भाजपने महिला नेत्यांचे पोस्टर जारी करत म्हटले, की बंगालला आता बुआ (आत्या) नको तर बेटी (मुलगी) पाहिजे. तर तृणमूल काँग्रेसनेही याला प्रत्युत्तर देत सांगितले, की बंगालला आपली मुलगीच पसंत आहे.

पश्चिम बंगाल राज्यात सत्ता आणण्यासाठी भाजपकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता भाजपने बंगालमध्ये एक पोस्टर जारी केले आहे. त्यामध्ये 9 महिला नेत्यांचा समावेश आहे. भाजप नेत्या रुपा गांगुली, देबश्री चौधरी, लॉकेट चॅटर्जी, भारती घोष, अग्निमित्रा पॉल यांचा समावेश आहे. बंगाल आपली स्वत:ची मुलगी पसंत करतो. पिशी (बुआ) नाही. तर दुसरीकडे तृणूलच्या चंद्रिमा भट्टाचार्य यांनी म्हटले, की बुआ हीदेखील बंगालचीच मुलगी आहे. सर्वांची एकच बुआ असते. ज्यांच्या चेहऱ्याचा भाजपने वापर केला त्या देखील कोणाच्या तरी बुआ असतीलच ना?

दरम्यान, तृणमूल काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना ‘बंगालची बेटी’ म्हणून दर्शवले आहे. यामध्ये टीएमसीने ममता यांना ‘बंगालची मुलगी’च्या रुपात दाखवत मुख्य अभियान ‘बांग्ला निजेर मेयेक चाय’ची सुरुवात केली.

तृणमूलकडूनही फोटो शेअर
तृणमूल काँग्रेसकडूनही ममता बॅनर्जी यांचा फोटो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये लिहिले, की त्यांचे जीवन न्यायासाठी संघर्षरत आहे. त्यांच्या मानवतेने बंगालच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाला खेचून घेतले आहे. त्यांच्या मैत्री आणि आपुलकीने त्यांना घरातील मुलगी बनवले आहे.