बंगाल निवडणुकीच्या सभेत PM मोदी म्हणाले – ‘BJP स्किमवर चालतेय तर TMC स्कॅमवर’

कोलकत्ता : पोलिसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालच्या बांकुरा येथे रविवारी मोर्चाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भाजप सरकार हे स्किमवर अर्थात योजनांवर चालते, तर तृणमूल सरकार हे स्कॅमवर अर्थात घोटाळ्यावर चालत आहे. तृणमूल सरकारचा मंत्र आहे – तिथं घोटाळा आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी निवडणूक मेळाव्यात सांगितले की, दीदी बंगालच्या विकासासाठी 2 मे नंतर नसणार आहे, आता ’खरे परिवर्तन ’ होणार आहे. यावेळी मोदी यांनी ममता बँनर्जी अर्थात दीदीवर टीका करत म्हणाले की, आता इथून पुढे भ्रष्टाचार होणार नाही आणि आम्ही सहन करणार नाही.

10 वर्षांपूर्वी आपण आपला खरा रंग दाखविला असता तर बंगालच्या लोकांनी तुम्हाला निवडले नसंत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, तृणमूल सरकार आयुष्मान भारत, पंतप्रधान किसान सन्मान निधी, थेट लाभ हस्तांतरण यासंबंधित योजनांमध्ये घोटाळा करू शकत नाही, म्हणूनच त्यांनी अंमलबजावणी करण्यास नकार दिला आहे. ही योजना कोणत्याही सरकारने अंमलात आणली पाहिजे. कोणीही त्याची अंमलबजावणी करू शकेल, परंतु तृणमूल काँग्रेस घोटाळा करण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहे.

आता बंगालच्या विकासाला लाथ नाही मारू देणार :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अर्थात दीदीवर निशाणा साधत नरेंद्र मोदी म्हणाले की, बंगालमधील दीदीचे लोक भिंतीवर चित्रे काढत आहेत. चित्रांत दीदी तिचा पाय (मोदी) माझ्या डोक्यावर मारत आहे. माझ्या (मोदी) डोक्याने फुटबॉल खेळत आहे. असे करून तुम्ही बंगालच्या संस्कार आणि इथल्या थोर परंपरेचा तुम्ही अपमान का करीत आहात?

मोदी पुढे म्हणाले की दीदी, तुमची तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या डोक्यावर पाय ठेवू शकता, मला लाथ मारा. पण, दीदी माझ्या इतर गोष्टी ऐका. मी तुम्हाला आता बंगालच्या विकासाला लाथ मारू देणार नाही. मी तुम्हाला बंगालच्या स्वप्नांना लाथ मारू देणार नाही.

मोदी म्हणाले, मी जितका जास्त प्रश्न विचारतो तितके दीदी माझ्यावर रागावते. आता ती म्हणत आहे की त्यांना माझा चेहरा देखील आवडत नाही. लोकशाहीला चेहरा नसतो, लोकांची सेवा असते, जनतेसाठी केलेले काम हीच कसोटी असते.

बंगालमध्ये भाजप खरा बदल घडवून आणेल :
पंतप्रधान म्हणाले की, भाजप बंगालमध्ये खरा बदल घडवून आणेल. राज्य यापुढे भ्रष्टाचार, सिंडिकेट, आपत्ती अशी रंगबाजी चालणार नाही. दीदी असे म्हणत आहेत की, खेल होबे, तर दीदी आणि त्यांचे सरकार केवळ 10 वर्षात बंगालच्या लोकांशी खेळले आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, बंगालमधील जनता दृढ आहे, की दीदी 2 मे रोजी जात आहेत. वास्तविक बदल होणार आहे. खरा बदल बंगालचा विकास, बंगालचा अभिमान वाढविणे, गोरगरीबांची सेवा करणे, सिंडिकेट तुरूंगात पाठविणे आणि भ्रष्टाचारीांवर कठोर कारवाई करणे असा होता. बंगालच्या विकासासाठी डबल इंजिन सरकार स्थापन करावे लागेल.

रामपाडाच्या बंधुंना राम-राम :
पंतप्रधान मोदी म्हणाले, जेव्हा मी आज बांकुराला आलो आहे, तेव्हा रामपाडाच्या दीदी आणि भाऊंना विशेष करून राम राम करेन. रामपाडाची आजकाल देशभरात चर्चा आहे. रामपाड्यात रामला बोलवले तर प्रत्येक घरात राम मिळेल.

केले सर्व रस्ते बंद :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुन्हा निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी जेव्हा मी तुमचे आशीर्वाद मागायला आलो तेव्हा दीदींनी येथे काय केले? ते मला आठवते. रॅली मैदानाकडे जाणारा सर्व रस्ता बंद केला होता. टेंट हाऊसमधून खुर्च्या न मिळाव्यात, याबद्दल पोलिसांना कामाला लावले होते. रॅलीत जमाव जमलेला पाहून ते म्हणाले की, असे दिसते आहे की आपण लोकांनी ब्रिगेडच्या मैदानातून स्पर्धा करण्याचे ठरविले आहे. जिथे जिथे हे पाहिवं तिथं तिथं लोकच दिसत आहेत.

(दीदी) एक महिला भाजपला देते टक्कर :
पश्चिम बंगाल राज्यात आता निवडणूका सुरू आहेत. या राज्यावर आपली सत्ता आणण्यासाठी भाजप अनेक प्रकारचे मार्ग अवलंबत आहे. या राज्यात निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी भाजप अधिक प्रमाणात पैसा, पावर (ताकद) वापरत आहे. तसेच केंद्रातील मंत्री पंतप्रधान आदींना बोलवून मोठ्या प्रमाणात वातावरण तयार करून भाजपचा गवगवा करण्यावर भर देत आहेत. मात्र, याविरुध्द एकटी महिला अर्थात दीदी म्हणजे ममता बँनर्जी टक्कर देत आहे. भाजपला केवळ ममता बॅनर्जी टक्कर देत असून दीदी सर्वांना भारी पडली आहे. दीदीच्या विकास कामांमुळे भाजपला आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागत आहे. म्हणून भाजपने विकासकामे सोडून धार्मिक मुद्द्यांना हात घालून लोकांना धर्मावरू पेटवून देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, दीदी भाजपचं सर्व कारनामे ओळखून आहे. विकासकामे, महिला सुरक्षा, जनतेची सेवा आदी विषयावरून दीदी अर्थात ममता बॅनर्जी आपल्या निवडणुकीचा प्रचार करत आहेत.