मुलायम, चमकदार आणि मजबूत केस मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये टाकाव्यात ‘या’ 5 गोष्टी

पोलिसनामा ऑनलाईन – केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी अनेकजण मेहंदीचा वापर करतात. यामुळं केसांना रंग प्राप्त होतो. परंतु यात आणखी काही गोष्टी एकत्र करून वापरल्या तर याचा खूप फायदा होतो. त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्यांचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊयात.

1) बीट – बीट उकडून मेहंदीमध्ये टाकल्यास. केसांना नैसर्गिक रंग मिळतो. यानं केस अधिक सुंदर दिसतात. बीटाच्या रसात असलेल्या अँटी ऑक्सिडंटमुळं केस हायड्रेट राहतात, केस कोरडे पडत नाहीत.

2) अंड्यातील पांढरा भाग – जर तुम्हाला केस मऊ, आणि चमकदार करायचे असतील तर अंड्यातील पांढरा भाग मेहंदीत एकत्र करून केसांना लावा. अंड्यात असणाऱ्या प्रोटीनमुळं केस सुंदर आणि चमकदार बनतात.

3) लिंबाचा रस – लिंबाचा रस मेहंदीत मिक्स करून ते मिश्रण केसांना लावलं तर केस निरोगी आणि मुलायम होतात. यामुळं केस रखरखीत किंवा शुष्क पडत नाहीत.

4) ऑलिव्ह ऑईल – ऑलिव्ह ऑईलमधील फॅट्समुळं केसांना भरपूर पोषण मिळतं. त्यामळं ऑलिव्ह ऑईल मेहंदीत मिक्स करून केसाना लावलं तर खूप फायदा होतो.

5) मेथी – मेथीच्या पावडरमध्ये भरपूर प्रोटीन असतात. यामुळं डोक्याची त्वचा इंफेक्शपासून दूर राहते. यामुळं केस मजबूत आणि मऊ होतात. मेथी पावडर मेहंदीमध्ये टाकून भिजवा. हे मिश्रण केसांना लावा.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.