अंड ‘ताकद’ देतं अन् तुमचा ‘जीव’ देखील घेऊ शकतं, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आहारात अंड्यांचा समावेश करावा असं आवर्जून सांगितलं जातं. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिनं असतात. मात्र कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा नेहमीच आरोग्यासाठी घातक असतो. दिवसांतून दोन अंड्यांपेक्षाही अधिक अंडी खाणं हे आरोग्यासाठी धोकादायकच नाही तर अंडी खाणं तुमच्या जीवावर बेतू शकतं. जाणून घ्या अंडी खाताना काय खबरदारी घ्यावी –

1) साधारणपणे दोन अंडी खाणं हे आरोग्यासाठी चांगलं आहे. मात्र त्यापेक्षा जास्त अंडी खायची असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

2) त्यामुळे एक अंडे पूर्ण खाल्ले तर इतर प्राणीजन्य पदार्थ (चीज, चिकन, मांस, दूध व दुग्धजन्य पदार्थ वगैरे) हे खाताना खूपच काळजी घ्यावी लागते. कारण त्यातूनही कोलेस्टेरॉल पोटात जात असते.

3) वजन जास्त असलेले लोक, हृदयविकार व मधुमेह असलेले लोक तसेच रक्तातील कोलेस्टेरॉल ज्यांचे वाढले आहे अशांनी अंड्याचा पिवळा भाग टाळावे.

4) शक्यतो कच्चे अंडे खाणे टाळावे . कच्चे ‘एग व्हाईट’ वा पिवळा बलक खाल्ल्याने ‘सॅल्मोनेला टायफी’ या विषमज्वराचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

5) अंडी फ्राय करून किंवा अती उकडून खाणं अयोग्य आहे. त्याऐवजी जरा वेळ उकडून किंवा हाफ फ्राय करून खाणे अधिक फायदेशीर ठरेल.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके