थापा मारणे म्हणजे चाणक्य निती का?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

लोकांना थापा मारुन पुन: पुन्हा राज्य आणायचे याच नितीला चाणक्य निती म्हणायचे असेल तर कसे व्हायचे ? असा प्रश्न उपस्थित करीत शिवसेनेने भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पुण्यातील व्याख्यानावर जोरदार टिका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी चाणक्य नितीनं राज्य कारभार करुन जनतेची काळजी घेतात, या भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विधानाचा शिवसेनेनं समाचार घेतला आहे.

[amazon_link asins=’B07DX1K7CT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f638568d-83fa-11e8-979b-a7fce4943476′]

भाजपा अध्यक्ष अमित शहा रविवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ‘आर्य चाणक्य-जीवन आणि काय: आजच्या संदर्भात’ या विषयावर बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मोदी चाणक्यांच्या सिद्धांतानुसार चालतात आणि जनतेची काळजी घेतात, असे शहा म्हणाले. शहांच्या या विधानाचा शिवसेनेने ‘सामना’ मधून जोरदार समाचार घेतला आहे.

मोदींच्या भाषणांवरही शिवसेनेने निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशात नवी राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत व मोदी-शहांसाठी ही संकटांची चाहूल आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेशसारखी मोठी राज्ये उद्याचे राजकीय भविष्य ठरवणार आहेत. पण या राज्यांची मानसिकता आता बदलत आहे. बोलघेवडेपणातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही. भावनिक विषयांना हात घातले जातात तेव्हा सरळ दंगलींना आमंत्रण दिले जाते. राजकारण अशा पद्धतीनंच करावे व निवडणुका जिंकाव्यात हे प्रभू श्रीरामांनी सांगितलेले नाही. चाणक्याचेही ते सूत्र नव्हते,’ अशा शब्दांमध्ये शिवसेनेने मोदी-शहा जोडीला लक्ष्य केले आहे.