SC ने केंद्राकडून मागविला तपशील, म्हणाले – ‘कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी काय पूर्वतयारी केली?’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले असतानाच आता वैद्यकीय तज्ज्ञांनी देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या लाटेत लहान मुलांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर संसर्गाची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन तिस-या लाटेला रोखण्यासाठी काय पूर्वतयारी केली आहे, याचा तपशील केंद्राने सादर करावा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. लहान मुलांपासून सर्वच वयोगटातील लोकांचे लसीकरण मोठ्या संख्येने होण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या. एम.आर. शहा म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट येणार असे गृहीत धरून तिचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला लस देण्याकरिता आतापासूनच शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे. तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधित झालेल लहान मूल जेंव्हा उपचारासाठी रुग्णालयात जातील. त्याेवळी त्यांच्या आईवडिलांनाही त्याच्यासोबत जावे लागेल. लहान मुलांनाही लस देण्यासंदर्भात आता केंद्राने योजना आखायला हवी.

त्याची पूर्वतयारी आतापासूनच केली तर भविष्यात कोरोनाशी अधिक प्रभावीपणे मुकाबला करता येईल. तसेच दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केल्यास त्याचा अन्य राज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाचे सॉलिसिटर जनरल तुषार यांनी म्हटले आहे. दरम्यान देशात कोरोनाची तिसरी लाट नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या प्रारंभी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे दिवाळीपूर्वी लसीकरण होणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेत युवकांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होण्याची शक्यता बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे साथरोगतज्ञ्ज्ञ डॉ. गिरीश बाबू यांनी व्यक्त केली आहे.