Whatsapp द्वारे घरबसल्या करा बँकिंगची ‘ही’ कामे, जाणून घ्या कोणत्या मिळतात सुविधा आणि काय आहे ‘चार्ज’

नवी दिल्ली : देशात इंटरनेटचे जाळे वाढल्याने बँका ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा देत आहेत. सध्या, व्हॉट्सअपवरून तुम्ही बँकिंग करू शकता. देशभरातील अनेक कमर्शियल बँक जसे की, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक व्हॉट्सअप बँकिंगची सुविधा देत आहेत. यामुळे एक मोठा फायदा हा आहे की, व्हॉट्सअप बँकिंग सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना रियल टाइम सुविधा मिळत आहेत. एक चांगली बाब ही आहे की, या सेवेचा उपयोग करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. व्हॉट्सअप बँकिंग सेवेचा लाभ घेण्यासाठी यूजर्स बँकेचा ग्राहक असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सअप बँकिंगद्वारे मिळणार्‍या सुविधा :

1 अकाऊंट बॅलन्स चेक करणे
2 अंतिम 3 व्यवहारांच्या डिटेल
3 क्रेडिट कार्डच्या देय रकमेची तपासणी
4 क्रेडिट कार्डवर उपलब्ध क्रेडिट मर्यादेची तपासणी
5 कुठेही, कधीही डेबिट/क्रेडिट कार्ड ब्लॉक आणि अनब्लॉक करणे
6 प्री अप्रूव्हड लोन ऑफरची डिटेल
7 इन्स्टासेव्ह खाते (बचत खाते) ऑनलाइन उघडणे

कसा घ्याल व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा लाभ :

स्टेप 1 : बँकेचा व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करा आणि मिस्ड कॉल करा.

स्टेप 2 : एक मिस्ड कॉल दिल्यानंतर तुम्हाला सदस्यता मिळेल. तुम्हाला बँकेच्या व्हॉट्सअप नंबरवरून एक वेलकम मेसेज येईल.

स्टेप 3 : कोणत्याही बँकिंग सेवेसाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅट सुरू करण्यासाठी इंग्रजीत एक मॅसेज टाइप करा ’हाय’. आवश्यकतेनुसार, तुम्हाला पुढील पर्याय निवडायचा आहे.

आयसीआयसीआय बँक
आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 8640086400 नंबर सेव्ह करा आणि व्हॉट्सअप मेसेजिंग प्लेटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या मोबाइल स्क्रीनवर एक सुरक्षित आणि इंटरॅक्टिव्ह मेनू मिळाल्यानंतर चर्चा सुरू करण्यासाठी ’हाय’ पाठवा. जी सुविधा उपलब्ध असेल बँक त्याची डिटेल्स देईल.

एचडीएफसी बँक
बँकेला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 70659 70659 वर एसएमएस पाठवा किंवा मिस्ड कॉल द्या. बँकेच्या सुविधा 24/7 365 (सुटी असतानाही) उपलब्ध आहेत. आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 70659 70659 नंबर सेव्ह करा ’हाय’ लिहून पाठवा. मॅसेज पाठवल्यानंतर तुम्हाला पलिकडून वेलकम मॅसेज मिळेल!

कोटक महिंद्रा बँक
आपल्या मोबाइल नंबरवरून 9718566655 वर एक मिस्ड कॉल करा. आपल्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 022 6600 6022 नंबर सेव्ह करा. व्हॉट्सअपवर जा. उपलब्ध सेवांच्या यादीत जाण्यासाठी एक इंग्रजीत मॅसेज हेल्प लिहून पाठवा.

कसे कराल सुरक्षित बँकिंग
लक्षात ठेवा, आर्थिक माहिती, खात्याबाबत माहिती संवेदनशील असते. यासाठी सावध राहा. यूजर्सने फोन आणि व्हॉट्सअप खाते सुरक्षित ठेवले पाहिजे.