WhatsApp कॉल सुद्धा करू शकता रेकॉर्ड, ताबडतोब जाणून घ्या सोपी ट्रिक !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप सध्याच्या काळात खुप पॉप्युलर मॅसेजिंग अ‍ॅप आहे. याद्वारे तुम्ही टेक्स्ट मॅसेजशिवाय ऑडियो आणि व्हिडिओ दोन्ही प्रकारचे कॉल करू शकता. अनेकदा तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून ऑडिओ कॉल करून बोलता आणि समोरचा तुम्हाला महत्वाचे काही तरी सांगत असतो, जे तुम्हाला नोट करायचे असते, पण कागद पेन नसतो.

अशावेळी आपण व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करून कामाची गोष्ट सेव्ह करू शकता. व्हॉट्सअ कॉल अँड्रॉइड आणि आयफोनमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी काही निवडक डिव्हाइसची आवश्यकता असते. मात्र, दुसर्‍या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. अशावेळी आपण दुसर्‍या व्यक्तीला कॉल रेकॉर्डिंगची माहिती द्या.

अँड्रॉइड फोनवर असा करा व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंग
* सर्व प्रथम आपण क्यूब कॉल रेकॉर्डर डाऊनलोड करा.
* अ‍ॅप ओपन केल्यानंतर व्हॉट्सअपवर जा आणि यानंतर त्या व्यक्तीला कॉल करा ज्याच्याशी तुम्हाला बोलायचे आहे.
* जर यादरम्यान तुम्हाला क्यूब कॉल व्हिजेट दिसत असेल तर याचा अर्थ कॉल रेकॉर्ड होत आहे.
* जर तुमच्या फोनमध्ये एरर दिसत असेल तर पुन्हा एकदा क्यूब कॉल रेकॉर्डर उघडा.
* यावेळी अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन व्हॉइस कॉलमध्ये फोर्स वॉइपवर क्लिक करा.
* या संपूर्ण प्रोसेसच्या नंतर पुन्हा एकदा व्हॉट्सअप कॉल करा.
* जर यावेळी सुद्धा क्यूब कॉल रिकॉर्डर दिसत नसेल तर हे तुमच्या फोनमध्ये काम करत नाही.

आयफोनवर असा करा व्हॉट्सअप कॉल रेकॉर्ड
* आयफोनवर मॅकच्या मदतीने कॉल रेकॉर्ड करू शकता.
* आयफोनला लायटनिंग केबलच्या मदतीने मॅक ने कनेक्ट करा.
* यानंतर आयफोनवर ट्रस्ट धीस कम्प्युटर दिसेल, त्यावर क्लिक करा.
* जर पहिल्यांदा मॅकशी आयफोन कनेक्ट करत असाल तर तुम्ही क्विक टाइम उघडा.
* यामध्ये तुम्हाला फाइल सेक्शनमध्ये जाऊन न्यू ऑडियो रेकॉर्डिंगचा पर्याय दिसेल.
* यामध्ये रेकॉर्ड बटनच्या खाली अ‍ॅरोचे निशाण दिसेल.
* ज्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि आयफोन निवडायचा आहे.
* या सर्व प्रोसेसनंतर क्विकटाइममध्ये रेकॉर्ड बटनवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअपवरून कॉल करा.
* कॉल कनेक्ट होताच, यूजर आयकॉन अ‍ॅड करा.
* यानंतर त्या व्यक्तीचा नंबर निवडा ज्याच्याशी बोलायचे आहे.
* कॉल रिसिव्ह होताच तुमचे बोलणे रेकॉर्ड होण्यास सुरूवात होईल.