WhatsApp Group Voice Call New Feature | आता तब्बल 32 लोकांशी एकाच वेळी करू शकता ‘ग्रुप व्हॉईस कॉल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – WhatsApp Group Voice Call New Feature | व्हॉट्सॲपने (WhatsApp) आपलं जगविख्यात जाळं पसरवलं आहे. व्हॉट्सॲप वेळोवळे नव्या अपडेटबाबत सूचना देत असतो. आता WhatsApp ने ग्रुप कॉलिंगसाठी (Group Call) नवीन फीचर आणलं आहे. iOS आणि Android दोन्हीवर हे फिचर उपलब्ध आहेत. आता युजर्सना व्हॉट्सॲप व्हॉईस कॉलमध्ये (Voice Call) एकाच वेळी 32 लोकांशी संवाद साधता येणार आहे. आधी केवळ 8 लोकांशी संवाद करता येत होता. मात्र नवीन अपडेटनुसाार 32 लोकांशी संवाद केला जाणार आहे. (WhatsApp Group Voice Call New Feature)

 

महत्वाचे हे नवीन फिचर व्हॉइस कॉलसाठीच उपलब्ध आहे. व्हिडीओ कॉलसाठी नाही. असं स्पष्ट केलं आहे. ज्यावेळेस तुम्ही voice call करता तेव्हा तुमचे आणि तुमच्या बरोबर जोडलेल्या इतरांचे नेटवर्क कनेक्शन मजबूत असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही ग्रूप व्हॉईस कॉलला व्हिडिओ कॉल मध्ये रूपांतरित करू शकणार नाही. त्याचबरोबर, कॉलमधून डिस्कनेक्ट करण्यासाठी, यूजरने त्यांचा फोन कट करणे आवश्यक आहे. ग्रुप चॅटवरून ग्रुप Voice Call करण्यासाठी स्टेप्स काय आहेत जाणून घ्या.

– Voice Call करण्यासाठी, तुम्हाला कॉल करायचा असलेल्या ग्रुप चॅटवर जा.

– तुमच्या ग्रुप चॅटमध्ये 33 किंवा अधिक सहभागी असल्यास ग्रुप कॉल बटणावर टॅप करा.

– तुमच्या ग्रुप चॅटमध्ये 32 किंवा त्यापेक्षा कमी सहभागी असल्यास व्हॉइस कॉलवर टॅप करा आणि तुमच्या पर्यायाची पुष्टी करा.

– फोनला उत्तर देणाऱ्या पहिल्या 7 लोकांनाच कॉलमध्ये सामील होण्याची परवानगी आहे आणि फक्त ग्रुप सदस्यांना सहभागी होण्याची परवानगी आहे.

– तुम्हाला कॉलमध्ये जोडण्याची इच्छा असलेली व्यक्ती सापडल्यावर व्हॉइस कॉल वर टॅप करा.

 

पर्सनल चॅट मधून Group Voice Call करण्यासाठी स्टेप्स –

– कॉल करू इच्छित असलेल्या लोकांपैकी एकासह पर्सनल चॅट उघडा.

– Voice Call करण्यासाठी, कॉल बटण दाबा.

– संपर्क कॉल स्वीकारतो तेव्हा टॅप करा. आता आणखी सहभागी जोडले जाऊ शकतात.

– तुम्ही कॉलमध्ये जोडू इच्छित असलेली दुसरी व्यक्ती शोधा.

– तुम्हाला आणखी संपर्क जोडायचे असल्यास, सहभागी जोडा वर टॅप करा.

 

Web Title :- WhatsApp Group Voice Call New Feature | whatsapp-group voice call new feature now you can make voice calls with not only eight but up to 32 people at a time

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा