सावधान ! WhatsApp वरील एक लहान चूक करेल तुमचं बँक अकाऊंट रिकामं, दिल्ली पोलिसांनी केलं अलर्ट, जाणून घ्या
नवी दिल्ली, वृत्तसंस्था : लॉकडाऊन दरम्यान कम्यूनिकेशनसाठी व्हॉट्सअॅप सर्वोत्तम पर्याय मानला जातो. ज्यामध्ये व्हाईस कॉलसह व्हिडिओ कॉल, ग्रुप कॉल देखील केला जाऊ शकतो. पण फसवणूक करणारे व्हॉट्सअॅपवर फसवणूकीसाठी नवीन पद्धती अवलंबत आहेत. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम विभागाने एका ट्वीटद्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले की, नवीन घोटाळ्याबद्दल व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना सतर्क केले जात आहे. ज्यात हॅकर आपल्या खात्याची माहिती घेऊन त्याला लॉक करतात.
व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक केल्याची ही घटना आहे, ज्यात हल्लेखोर पहिल्यांदा कोणा दुसऱ्याचे बँक अकाउंट हायजॅक करतात, त्यानंतर संबंधित मित्र किंवा कुटूंबाच्या सदस्याशी बोलतात आणि आर्थिक व्यवहारासाठी तपशील विचारतात. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, हे लोक व्हॉट्सअॅप टू लेयर ऑथेंटिकेशनला क्रॅक करून अकाउंटला लॉक करतात. दिल्ली पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले की, ‘हल्लेखोर डुप्लिकेट खात्याचा वापर करून व्हेरिफिकेशन पिन शेअर करण्यास सांगतात, पिन शेअर होताच खाते हायजॅक होते. त्यांनतर OTP आणि पैशांची मागणी करतात.
Cyber Safety Information – 🔐 Hijacking of WhatsApp Accounts.
Threat – Attackers obtain WhatsApp verification PIN from target using a fake account with official WhatsApp logo as display picture to trick users into believing that it is the official account of WhatsApp tech. team pic.twitter.com/m7mEytxibY
— IFSO/CCU Delhi Police (@DCP_CCC_Delhi) June 18, 2020
अशा प्रकारे करतायेत फसवणूक-
दिल्ली पोलिसांनी तपशिलात सांगितले कि, हा हॅकर स्वत: ला व्हॉट्सअॅप यूजर्स स्टाफ सांगतो. वापरकर्त्यांना आत्मविश्वास देण्यासाठी हे लोक बनावट अकाउंट वापरतात ज्यात व्हॉट्सअॅपचा लोगो देखील असतो. त्यानंतर, व्हॉट्सअॅप अकाऊंटद्वारे वापरकर्ते व्हेरिफिकेशन कोड विचारतात आणि स्मार्टफोनमधून वैयक्तिक माहिती चोरतात. हे लोक पहिल्यांदा एक संदेश पाठवतात ज्यात 6-अंकी कोड वापरकर्त्याची ओळख व्हेरीफाई करण्यासाठी शेअर करण्यास सांगतो. व्हॉट्सअॅपची अधिकृत टीम समजून वापरकर्तेही सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात.