WhatsAppचे ‘हे’ नवीन ५ फिचर अतिशय फायदेशीर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्स्टंट मॅसेजिंग ऍप असणारे व्हाट्सअपमध्ये ग्राहकांना लवकरच नवीन फीचर्स पाहायला मिळणार आहेत. यामधील काही फीचर्स सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीत. याचे कारण म्हणजे या फीचर्सचे टेस्टिंग चालू असते. त्यामुळे काही फीचर्स टेस्टिंग करत असतानाच बंद केले जातात. तांत्रिक कारणांमुळे किंवा त्या फीचरला हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही तर कंपनी हे करत असते. मागील काही दिवसांत कंपनीने ५ नवीन फीचर्स आणले आहेत. यातील काही फीचर्सची तुम्हाला माहिती असेल. मात्र ज्यांना माहित नाही त्यांना आम्ही या फीचर्सविषयी आज सांगणार आहोत.

हे आहेत नवीन पाच फीचर्स

१)प्रोफाइल फोटो सेव करण्याचा पर्याय – 
यापुढे ग्राहकांना हे फिचर वापरात येणार नाही. कंपनीने हे फिचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. मात्र काही वापरकर्त्यांचे मत आहे कि, स्क्रीनशॉटचा पर्याय देखील बंद करायला हवा.

२)अल्बम इंप्रूवमेंट – 
यामध्ये तुम्हाला फोटो किंवा व्हिडीओ आल्यानंतर तुम्हाला तुमच्या अल्बममध्ये किती फोटो आहेत आणि त्याची साईज काय आहे याचीदेखील माहिती मिळते. त्याचबरोबर या फीचरच्या लेआउटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.

३)दुसऱ्या कॉन्टैक्ट्सचे फोटो पाठवता येणार नाहीत – 
या नवीन फीचरमध्ये तुम्हाला आता ज्या कुणाला फोटो पाठवत असेल. त्याचे यापुढे नाव दिसणार आहे. याआधी हे फिचर नव्हते. हे संपूर्णपणे नवीन फिचर देण्यात आले आहे.

४) फॉरवर्ड काउंट फीचर
याआधी कंपनीने फॉरवर्ड केलेल्या मॅसेजला Forwarded असे लेबल देण्यास सुरुवात केली आहे. यापुढे हा मॅसेज कितीवेळा याआधी फॉरवर्ड करण्यात आला आहे,याचीदेखील माहिती मिळणार आहे. त्यामुळे या फीचरचा खूप मोठा उपयोग ग्राहकांना होणार आहे.

५)व्हाट्सअप न उघडताच पाठवा मॅसेज
हे नवीन फिचर नाही, मात्र ज्यांना हे फिचर माहित नाही. त्यांच्यासाठी हे खूप चांगले फिचर आहे. यामध्ये तुम्ही मोबाईलच्या सर्च काँटॅक्ट्स मध्ये जाऊन थेट व्हाट्सअप संदेश पाठवू शकता. त्यामुळे अशाप्रकारे तुम्ही व्हाट्सअप न उघडताच संदेश पाठवू शकता.

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या