‘WhatsApp’ आणतंय ‘हे’ अत्यंत महत्वाचे ५ नवीन फिचर, आवश्य जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅपवर सर्वात आधिक प्रमाणात वापरले जाणारे अ‍ॅप आहे. भारतातील सर्वात जास्त युजर्स हे व्हॉट्स अ‍ॅप वापरतात. त्यासाठी नवे फिचर्स कंपनी युजर्सला देणार आहे आणि कंपनी त्यात इंप्रुवमेंट आणणार आहे. त्यातील हे काही नवे फिचर असे आहे जे व्हॉट्सअ‍ॅप लवकरच येऊ शकतात.

डार्क मोड –
व्हॉट्स अ‍ॅप मागील काही काळापासून डार्क मोड या फिचरची टेस्टिंग करत आहे आणि हेच ते फिचर आहे ज्याची युजर्स आतुरतेने वाट पाहत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपच्या विविध सेक्शनमध्ये डार्क मोड चालेल. हे महत्वपूर्ण फिचर व्हॉट्स अ‍ॅप लवकरच आणणार आहे.

फिंगर प्रिंट –
व्हॉट्स अ‍ॅप ने ios युजर्ससाठी फिंगर प्रिंट ऑथेंटिकेशनचे फिचर काही काळासाठी लागू केले आहे. अ‍ॅपलच्या ज्या स्मार्ट फोन मध्ये फेस आयडी आहे त्यांना आयडी सपोर्ट देण्यात आला आहे. परंतू अजून तरी अ‍ॅन्ड्राईड बाबत अजून कोणतीही बातमी आलेली नाही, अ‍ॅण्ड्राईड युजर्स याची वाट पाहत आहेत. परंतू व्हॉट्सअ‍ॅपने रिपोर्ट मध्ये कंपनी अ‍ॅण्ड्राईडसाठी फिंगर प्रिंट ऑथेंटिकेशन आणण्याची तयारी केली आहे.

स्टेट्स शेअर फिचर –
फेसबुकचे सीईओ मार्क जकरबर्गचा प्लॅन आहे की, इंस्टा, मेसेज आणि व्हॉट्सअ‍ॅपला एकत्रित करुन क्रॉस प्लेटफार्म मेसेजिंग सिस्टिम तयार करणे. यावर देखील काम करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये याच अंतर्गत एक फिचर येत आहे. हेच फिचर आल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप युजर्स स्टेट्सला फेसबुकवर देखील शेअर करु शकतील.

कॉन्टेक्ट रॅकिंग फिचर –
व्हॉट्स अ‍ॅप मध्ये रॅकिंग कॉन्टेक्टसचे फिचर देण्यात येणार आहे.यात युजर्स सर्वात जास्त त्यांच्या बरोबर बोेल त्यांचे संपर्क फेवरेट म्हणून मार्क करण्यात येईल आणि टॉपवर येतील. ज्यामुळे तुम्हाला सतत कॉन्टॉक्ट सर्च करण्याची गरज भासणार नाही. हे फिचर ऑटोमेटिक काम करेल.

QR Code फिचर –
व्हॉट्सअ‍ॅप एक फिचर आणत आहेत ज्यात QR कोडची सुविधा देण्यात आली आहे. सध्या याची टेस्टिंग सुरु आहे. या फिचरचा वापर करुन युजर्स एकमेकांना समावेश करु शकतात. हे फेसबुक मेसेंजरच्या QR कोड प्रमाणे काम करेल, हे QR कोड युजर्स व्हिजिटिंग कार्डवर देखील प्रिंट करु शकतील.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

Loading...
You might also like