WhatsApp ने भारतात ३७.१६ लाख अकाउंट्स केली बॅन… वाचा – कोणत्या लोकांचे अकाउंटवर होतेय अॅक्शन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मेटाच्या मालकीचे इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) नोव्हेंबरमध्ये ३७.१६ लाख खात्यांवर बंदी घातल्याची माहिती दिली आहे. ऑक्टोबरमध्ये बंदी घालण्यात आलेल्या खात्यांपेक्षा हा आकडा ६० टक्क्यांनी अधिक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये व्हॉट्सअॅपने भारतात २३.२४ लाख अकाउंट बॅन केली होती. त्यापैकी ८.११ लाख अकाउंट सक्रियपणे बंद करण्यात आली होती (WhatsApp Ban Account).
व्हॉट्सअॅपचा इंडिया मंथली रिपोर्ट
माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ अंतर्गत प्रकाशित झालेल्या भारताच्या मासिक अहवालात व्हॉट्सअपने म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान, ३,७१६,००० व्हॉट्सअप अकाउंटवर बंदी घातली होती. त्यापैकी ९९०,००० खाती सक्रियपणे बॅन केली होती.
ऑक्टोबरच्या तुलनेत आल्या जास्त तक्रारी
व्हॉट्सअॅपला (WhatsApp) ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये यूजर्सकडून खात्यांवर बंदी घालण्यासाठी जास्त अपील आली आहेत. व्हॉट्सअॅपला नोव्हेंबरमध्ये यूजर्सकडून ९४६ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यामध्ये ८३० खात्यांवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यापैकी केवळ ७३ खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आम्ही सर्व बाबींवर लक्ष ठेवतो, असे व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. व्हॉट्सअॅप अशावेळी खात्यांवर कारवाई करते, तसेच ज्यांच्यावर आधीच प्रतिबंध आहे अशी खाती पुन्हा सुरू करते.
आयटी नियम २०२१
रिपोर्टमध्ये असेही नमूद केले आहे की, तक्रार चॅनेलद्वारे यूजर्सच्या तक्रारींना प्रतिसाद देणे आणि त्यावर कारवाई करण्याव्यतिरिक्त, व्हॉट्सअप त्यांच्या प्लॅटफॉर्मवर हानिकारक वर्तन रोखण्यासाठी टूल्स आणि सोर्सेस तैनात करते. नवीन आयटी नियम २०२१ नुसार, मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला (५० लाखांहून जास्त यूजर्स) प्रत्येक महिन्याला अनुपालन रिपोर्ट प्रकाशित करणे, प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील आणि केलेल्या कारवाईचा उल्लेख अनिवार्य असेल.
Web Title :- WhatsApp | whatsapp banned 37 16 lakh accounts in india november 60 percent more than october
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | पुणे रेल्वे स्थानकावरुन अपहरण झालेले बाळ 12 दिवसांनी आईच्या कुशीत; दोनजण ताब्यात
Pune Crime | पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या महिलेला पकडले, 270 ग्रॅम सोन्याची भुकटी जप्त