Pune Crime | पुणे रेल्वे स्थानकावरुन अपहरण झालेले बाळ 12 दिवसांनी आईच्या कुशीत; दोनजण ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे रेल्वे स्थानकावरून (Pune Railway Station) एका अडीच वर्षाच्या मुलाचे अपहरण (Kidnapping) केल्याची घटना शनिवारी (दि.11) रोजी घडली होती. लोहमार्ग पोलिसांनी (Pune Railway Police) या गुन्ह्याचा तपास करुन 12 दिवसांनी मुलाची सुखरुप सुटका करुन त्याला पालकांच्या ताब्यात (Pune Crime) दिले. ही कारवाई लोहमार्ग पोलिसांनी रांजणगाव परिसरात गुरुवारी (दि.22) सायंकाळी केली.

 

विजय अनंत जयस्वाल (Vijay Anant Jaiswal) आणि सुमन शर्मा (Suman Sharma) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. तर भूपेश भुवन पटेल Bhupesh Bhuvan Patel (वय-2 वर्षे 11 महिने) असे अपहरण झालेल्या बाळाचे नाव आहे. पुण्यात उदरनिर्वाहासाठी आलेले एक दाम्पत्य त्यांच्या मुळगावी झारखंड येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील सरकत्या जिन्यालगत रात्री साडे आठच्या सुमारास एक महिला व एक पुरुष त्यांच्या जवळ आले. त्यांच्यासोबत गप्पा मारत असताना महिलेने तिच्याकडील खाऊ मुलाला दिला. (Pune Crime)

 

या दरम्यान, मुलाबद्दल आपल्यला जिव्हाळा असल्याचे दाखवून त्या दोघांनी बाळाला आणखी खाऊ घेऊन येतो असे सांगून मुलाला घेऊन गेले. मात्र, ते परत न आल्याने याबाबत रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने तपास करुन तब्बल 12 दिवसानंतर मुलाला रांजणगाव परिसरातून ताब्यात घेतले. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, त्यांना बाळ होत नसल्याने या आरोपींनी पुणे रेल्वे स्थानकातून या मुलाचे अपहरण केले होते.

ही कामगिरी पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे (DGP Dr. Pragya Sarvade), लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पुणे लोहमार्ग अपर पोलीस अधिक्षक गणेश शिंदे (Pune Lohmarg Addl SP Ganesh Shinde), पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) चंद्रकांत भोसले (DySP (Headquarters) Chandrakant Bhosle) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लोहमार्ग पोलीस ठाणेचे (Pune Lohmarg Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर (Senior Inspector Pramod Khopikar), स्थानिक गुन्हे शाखा (LCB) लोहमार्ग पुणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ईरफान शेख, सहायक पोलीस निरीक्षक आंतरकर, वाचक शाखेकडील महिला सहायक पोलीस निरीक्षक पालवी काळे, आरपीएफ पोलीस निरीक्षक बी.एस. रघुवंशी,
सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद झोडगे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हगवणे, पोलीस अंमलदार हगवणे,
सुनिल कदम, टेके, दांगट, कांबळे, चिले, कुंभार, पवार, गवळी, मधे, केंद्रे,
तांत्रिक विश्‍लेषण विभागाकडील अंमलदार जगताप, पवार, गवारी तसेच आर. पी.एफ. पुणे कडील आरक्षक युवराज गायकवाड,
विशाल माने, रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाणेकडील (Ranjangaon MIDC Police Station) शिंदे,
कुतवळ यांनी मदत केली आहे.

 

Web Title :- Pune Crime | missing two and half year boy from pune railway station found after 12 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP Protest | राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

IPS Rashmi Shukla | रश्मी शुक्ला प्रकरणावरून अजित पवार विधानसभेत आक्रमक