WhatsApp ग्रुप अ‍ॅडमिन करु शकतो ग्रुपवरील कोणताही मेसेज डिलीट, जाणून घ्या नवीन फिचरबद्दल (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या युजर्ससाठी नवे फिचर्स (New features) आणत असते. यातील महत्त्वाचे फिच म्हणजे आता ग्रुप अ‍ॅडमिन (Group admin) ग्रुपमधील सर्व मेसेज डिलीट (Delete message) करु शकणार आहे. म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमिन डिलीट फॉर ऑल फीचरचा (Delete for all feature) वापर करुन सर्वांसाठी ग्रुपवरील मेसेज डिलीट करु शकतो. एका वृत्तानुसार, व्हॉट्सअ‍ॅपने (WhatsApp) एक नवीन 2.22.1.1 अपडेट जारी केले आहे. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर (Messaging platform) लवकरच अ‍ॅडमिनला ग्रुपमधील दुसऱ्यांचे मेसेज डिलीट करता येणार आहेत.

 

 

जर एखाद्या ग्रुपवर अनेक ग्रुप अ‍ॅडमिन असलीत तरच हे अपडेट लागू होणार आहे. रिपोर्टनुसार अखेर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज डिलीट करण्याविषयी नवीन अपडेट (New update) देत आहे. यामुळे अ‍ॅडमिन ग्रुपमध्ये आलेले मेसेज हटवू शकतो. याशिवाय भविष्यातील अपडेटमध्ये ग्रुप अ‍ॅडमिन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सला मॉडरेट करु शकतो. हे फीचर सध्या इंटरनल टेस्टिंग फेजमध्ये (Internal testing phase) आहे. हे फीचर कधी येणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

 

 

WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे.
नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी नवीन सुरक्षा अपडेट आणले.
व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन प्रायव्हसी फिचर (Privacy feature) युजर्सच्या चॅटसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि स्टेटस,
प्रोपाईल फोटो आणि बरेच काही हाईड करण्याच्या बाबतीत आहे.
व्हॉट्सअ‍ॅपने युजर्ससाठी एक नवीन प्रायव्हसी फिचर्स आले आहे.
यात अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप कॉन्टॅक्ट, ज्याच्याशी कधीही चॅट केले नाही,
त्याला लास्ट सीन आणि ऑनलाईन स्टेटस दिसणार नाही.

 

Web Title :- WhatsApp | whatsapp group admins will delete messages for everyone in a group know about new features of whatsapp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा