खुशखबर ! WhatsApp ने आणले खास अ‍ॅप, फोन बंद झाला तरी सुद्धा डेस्कटॉपवरून करू शकता चॅटिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ने आपल्या यूजर्सला चांगली बातमी दिली आहे, ज्यामध्ये यूजर्सला आता फोन डेस्कटॉपला लिंक करण्याची गरज भासणार नाही. मेटाच्या WhatsApp ने विंडोजसाठी नवीन विंडोज नेटिव्ह अ‍ॅप सादर केले आहे, ज्यातून यूजर्स फोन पीसीला कनेक्ट न करता मेसेज सेंड, रिसिव्ह आणि सिंक करू शकतील. व्हर्जच्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅपने आपले विंडो अ‍ॅप बीटावरून काढून सर्वांसाठी उपलब्ध केले आहे, आणि ते मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरून डाऊनलोड करता येऊ शकते.

 

यापूर्वी विंडोजवर यूजर्सला व्हॉट्सअ‍ॅपचे वेब-बेस्ड डेस्कटॉप अ‍ॅप डाऊनलोड करावे लागत होते किंवा आपल्या वेब ब्राऊजरवरून मेसेजिंक सर्व्हिसचा वापर करावा लागत होता.

 

नवीन अ‍ॅप, विंडोजचे नेटिव्ह अ‍ॅप आहे आणि फोन अ‍ॅपवर अवलंबून न राहता एका स्टँडअलोन अ‍ॅपप्रमाणे काम करते. या अ‍ॅपबाबत व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, यामुळे स्पीड वाढेल, आणि यूजरच्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी डिझाईन आणि ऑप्टिमाईज केले आहे. (WhatsApp)

 

अ‍ॅप यूजर्सला त्यांचा फोन ऑफलाईन असतानाही नोटिफिकेशन आणि मेसेज प्राप्त करण्याची परवानगी देईल.

 

FAQ वेब पेजनुसार, हे नवीन डेस्कटॉप अ‍ॅप विंडोजवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
ते मायक्रोसॉफ्ट अ‍ॅप स्टोअरद्वारे डाऊनलोड करता येऊ शकते.
एकदा ते डाऊनलोड आणि इन्स्टॉल केल्यानंतर लॉगइन करण्यासाठी सर्वप्रथम…

1 – सर्वप्रथम आपल्या फोनमध्ये WhatsApp ओपन करा.

2 – आता अँड्रॉईड किंवा आयफोनच्या सेटिंगच्या ‘More Options’ वर जा.

3 – येथे Linked Devices वर टॅप करा.

4 – आता फोनचा कॅमेरा व्हॉट्सअ‍ॅपवरील क्यूआर कोडवर घेऊन जा.

 

सध्या मॅक ऑपरेटिंग सिस्टमसाठी व्हॉट्सअ‍ॅप नेटिव्ह अ‍ॅप डेव्हलपमेंट स्टेजवर आहे.
ज्यांना याचा वापर करायचा आहे ते लोक WhatsApp बीटा प्रोग्राम अर्ली अ‍ॅक्सेससाठी डाऊनलोड करू शकतात.

 

Web Title : – WhatsApp | whatsapp new standalone app for windows users can now message and chat without having phone from desktop

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा