खळबळजनक ! स्वत:च्याच मुलीसोबत लग्न करू इच्छित होते महेश भट, भर पत्रकार परिषदेत केलं होतं ‘हे’ धक्कादायक विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर प्रतिक्रिया देताना मुकेश भट यांनी सांगितलं होतं की, त्यांना आधीच याची चाहूल होती की, सुशांत असं काही करेल. या गोष्टीनंतर आता सुशांतचे चाहते भडकले आहेत. इतकंच नाही तर त्यांचे भाऊ महेश भट यांचेही काही वाद आता नव्यानं समोर येताना दिसत आहेत.

डायेरक्टर आणि प्रोड्युसर महेश भट कायमच वादात राहिले आहेत. अनेक वर्षांपूर्वी स्टारडम या मॅगेझीन साठी त्यांनी मुलगी पूजा भटसोबत लिपलॉक किसिंग सीन दिला होता. हा मॅगेझिनवरचा कवर फोटो होता. यावरून खूप वाद झाला होता. इतकंच नाही तर या वादानंतर त्यांनी स्पष्टीकरण देण्यासाठी पत्रकार परिषदही बोलावली होती. यावेळी त्यांना अनेक उलट सुलट प्रश्न विचारण्यात आले होते. नमेकी यावेळी महेश भट यांची जीभ घसरली होती.

महेश असेही म्हणाले होते की, पूजा जर माझी मुलगी नसती तर तिच्यासोबत लग्न केलं होतं. यानंतर वाद अजूनच वाढला होता. यानंतर पुन्हा त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली होती. महेश भट हे भारतीय संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम करत आहे असा आरोपही त्यांच्यावर होऊ लागला होता. महेश भट खूपच वादात सापडले होते.

महेश भट यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 20 वर्षांच्या लॉरेन ब्राईट सोबत लग्न केलं होतं. परंतु हे लग्न जास्त काळ टिकलं नाही. लॉरेननं तिच्ं नाव बदलून किरण ठेवलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. एक पूजा आणि दुसरा राहुल. परवीन बाबी सोबतच्या अफेअरमुळं किरण आणि महेश वेगळे झाले.