‘ती’ आंघोळ करत असताना चोरुन बघणाऱ्या आजोबांचा मुक्काम पोलीस कोठडीत

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

इमारतीच्या दुरुस्तीचे काम चालू असताना एका फ्लॅटमध्ये घुसखोरी करत महिला आंघोळ करत असताना चोरून बघणे एका पासष्ट वर्षीय आजोबांना चांगलेच महागात पडले आहे. दत्ताराम सुर्वे असे या आजोबांचे नाव असून त्यांची रवाणगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महिला ज्या इमारतीमध्ये राहते त्या बिल्डिंगमध्ये सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामुळे कामासाठी इमारतीच्या बाजूने बांबू बांधण्यात आले आहेत. तसेच काही खिडक्यांचे ग्रील काढण्यात आले आहेत. या ठिकाणी अनेक कामगार काम करत असून, आरोपी आजोबा देखील त्या ठिकाणी कामगार आहेत. काम चालू असताना आजोबांनी एका घरात प्रवेश केला. त्यावेळी त्या घरातील महिला बाथरुममध्ये आंघोळ करत होती. हे बघून आजोबा तिथेच दडून महिलेला चोरून पाहू लागले.

यावेळी अचानक महिलेचे आजोबाकडे लक्ष गेले असता ती घाबरली. कशीबशी ती बाहेर धावत आली व तिने घरच्यांना याबद्दल सांगितले. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर आजोबांनी त्या ठिकाणावरुन पळ काढला. त्यानंतर महिलेनं इमारतीचे सेक्रेटरी यांच्याकडे तक्रार केली. याबाबतची माहिती सेक्रेटरीने पोलिसांना दिली असता त्यांनी दत्ताराम सुर्वेला अटक केली.