माढ्याचा तिढा : जिथं आहे तिथं समाधानी , उमेदवारीच्या स्पर्धेत नाही 

मोहोळ : पोलीसनामा ऑनलाईन – माढा मतदारसंघात मी उमेदवारी करण्यासाठी इच्छुक नाही. मी जिथं आहे तिथंच समाधानी आहे असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी म्हणले आहे . माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादीत सध्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यामुळे संभाव्य उमेदवार म्हणून राजन पाटील यांचे देखील नाव चर्चेत आहे . त्यावर त्यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे.

शरद पवार यांनी माघार घेतल्यानंतर माढा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी माजी आमदार दीपक साळुंखे आणि संजय शिंदे यांचे नाव पुढे येते आहे. त्याच बरोबर राजन पाटील यांना उमेदवारी दिली तर गटबाजी होणार नाही अशी अटकळ राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी लावली आहे. म्हणून राजन पाटील यांचे नाव माध्यमातून झळकू लागले आहे.  राजन पाटील यांनी माध्यमांना सामोरे जाऊन या बाबत स्पष्टीकर दिले आहे. मी निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही. तसेच जिथं आहे तिथंच मी खुश आहे. म्हणून मी माढ्याच्या उमेदवारीच्या स्पर्धेत नाही. त्याच प्रमाणे माढा मतदारसंघात माझा प्रभाव असणारा भाग येत नाही त्यामुळे मी उमेदवारी कशी करणार असे राजन पाटील यांनी म्हणले आहे.

मला पक्षाने भरपूर दिले आहे. आता जिथं आहे तिथं मी समाधानी आहे. माढ्यातून आणि सोलापुरातून ज्या उमेदवाराची नावे दिली जातील त्यांचा प्रचार करण्याचे काम मी करत राहील असे राजन पाटील म्हणाले आहेत. माझ्या नावाची चर्चा माढ्याच्या उमेदवारीसाठी सुरु आहे हे मला माध्यमातूनच समजले आहे असे राजन पाटील म्हणाले आहेत.