Coronavirus : मदतीसाठी पुढे येणारेच हात ठरु नयेत ‘कोरोना’साठी आमंत्रण ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊनच्या काळात अनेक लोक गरीब आणि असहाय्य लोकांच्या मदतीला येत आहे. परंतु कोरोनापासून वाचण्यासाठी गर्दी टाळणं आवश्यक आहे त्यामुळे नियमांचं पालन होणं गरजेचं आहे. नाहीतर असे व्हायला नको की मदतीसाठी पुढे आलेले हातच गरीबांसाठी आणि शहरवासियांसाठी धोकादायक ठरतील.

निवारच्या काही व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन डीएलएफ कॉलनी, जनता कॉलनी अशा परिसरात स्वस्तात खाद्य विक्री सुरु केली त्यामुळे खरेदीदारांची धांदल उडाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला. देशात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. ज्यामुळे शासन प्रशासन, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना गरीबांना मदत देत आहे. हे संघटन सकाळी, संध्याकाळी तयार करुन गरिबांच्या घरी पोहोचवलं जात आहे.

बेघरांच्या राहण्याची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात आहे. गरीबांना जेवण पुरवलं जात आहे. अशात मदतीचा हात म्हणून शनिवारी काही व्यापाऱ्यांनी गरीबांना स्वस्त किंमतीत पीठ, तेल, बटाटे, साखर, चहापती इद्यादी उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली.

वाहनातून हे सामान विविध ठिकाणी गरीबांमध्ये वाटले जात आहे. वस्तूंची विक्री अर्धा किंमतीत होत असल्याने सामान खरेदी करण्यासाठी लोकांची धांदल उडत आहे. या वस्तू विकताना महिला आणि पुरुषांच्या वेगवेगळ्या रांगा तर तयार करण्यात येत आहेत परंतु सोशल डिस्टंसिंगकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम हा झाला की लोकांमध्ये धक्काबुकी होऊ शकते.

सकाळी 10 वाजेपासून ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत सामान वाटले जात आहे. ही स्थिती जनता कॉलनीत सामान वाटपावेळी दिसली. या मदतीअंतर्गत सारख 20 रुपये, 1 लीटर मोहरीचे तेल 50 रुपये, एक किलो बटाटे 10 रुपये, चहापत्ती 10 रुपये, पाच किलो कांदा 65 रुपये अशा किंमतीला विकला जात आहे.