एक लाखाची लाच स्विकारताना सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सासवड येथील न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात जामीन मंजुर होण्यासाठी मदत करण्याकरिता दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी करून एक लाख रूपयाची लाच स्विकारताना सासवड पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोघांविरूध्द सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’394235a2-7b5f-11e8-9b4c-21adb789f8f6′]

सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकुंद काशिनाथ पालवे (42, नेमणुक ः सासवड पोलिस स्टेशन) आणि श्रीकांत बाळासाो ताम्हाणे (29, रा. इखतपुर, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली होती. तक्रारदाराविरूध्द सासवड पोलिस ठाण्यात भादंवि 325 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हयात सासवड न्यायालयात जामिन मिळावा म्हणून तक्रारदार यांनी अर्ज केला आहे. त्यांना जामिन मिळवुन देण्यास मदत करण्याकरिता आरोपी सहाय्यक पोलिस निरीक्षक मुकुंद काशिनाथ पालवे यांनी खासगी व्यक्‍ती श्रीकांत बाळासाो ताम्हाणे यांच्याकरवी तक्रारदाराकडे दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. एसीबीच्या कार्यालयात तक्रार प्राप्‍त झाल्यानंतर एसीबीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पालवे हे तक्रारदाराकडे लाचेची मागणी करीत असल्याचे निष्पन्‍न झाले. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करण्याचे नियोजन केले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार एसीबीच्या पथकाने पुरंदर तालुक्यातील इखतपुर या गावाच्या बस स्टॉपवर सापळा रचला.

[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4a9aabf1-7b5f-11e8-8ff8-5ff0ab397d5e’]

सहाय्यक पोलिस निरीक्षक पालवे यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्‍ती ताम्हाणे यांनी सरकारी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे एक लाख रूपयाची लाच स्विकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सहाय्यक निरीक्षक पालवे आणि खासगी व्यक्‍ती ताम्हाणे यांना अटक केली. पुणे विभागाचे पोलिस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक सुहास नाडगौडा, उपाधिक्षक शेंडगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.