Whimsical AI Artistry | राज्यातील नेत्यांचे हे क्युट डिस्नी कार्टून फोटो होत आहेत तुफान व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – Whimsical AI Artistry| आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) वापर सध्या जगभर सुरु आहे. मानवी बुद्धीच्या पुढे जाऊन ही कृत्रिम बुद्धिमत्ता कार्य करताना दिसत आहे. भविष्यात अनेक कामे अचूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचा प्रत्यय आताच येतो आहे. सध्या AI चा वापर करुन कार्टुन चित्रे काढण्याचा ट्रेन्ड आहे. अनेक लोक आपले कार्टूनिस्ट फोटो (Cartoonist Image) शेअर करत असतात. यामध्ये आता महाराष्ट्रातील नेत्यांची भर पडली आहे. नेत्यांचे असे डिस्नी कार्टून फोटो (Whimsical AI Artistry) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे (Amit Wankhede) यांनी राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कार्टुन इमेजेस सोशल मीडियावर पोस्ट केले. (NCP Leader AI Artistry) त्यानंतर हे फोटो तुफान व्हायरल झाले असून लोकांसह ते नेत्यांनाही आवडल्याचे दिसत आहे. अमित वानखेडे यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे फोटो तयार केले. यामध्ये पहिल्या भागात राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (MP Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) या प्रमुख नेत्यांचे चित्र रेखाटले आहे.

 

 

अमित वानखेडे यांनी याचा दुसरा भाग देखील पोस्ट केला असून यामध्ये दिवंगत नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), विलासराव देखमुख (Vilasrao Dekmukh), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde), गिरीष बापट (Girish Bapat), प्रमोद महाजन (Pramod Mahajan), विनायक मेटे (Vinayak Mete), आर आर पाटील (R R Patil) आणि राजीव सातव (Rajiv Satav) या दिवंगत नेत्यांचे चित्र काढले आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स (Maharashtra Leader AI Artistry)वापरुन बनवलेल्या इमेजमुळे त्यांच्या पुन्हा स्मृती जाग्या झाल्या आहेत.

 

 

या AT पेन्टींगचे (Whimsical AI Artistry) नेत्यांकडून कौतुक होत असून कलाकार अमित वानखेडे यांचे धन्यवाद मानण्यात येत आहेत. नेत्यांनी हे फोटो रिपोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फोटो ट्वीट करत लिहीले आहे, “अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार! पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल. कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे.” अशा शब्दात जयंत पाटलांनी अमित वानखेडे यांचे कौतुक केले आहे. तर दिलीप वळसे पाटील यांनी देखील ट्विट करत आभार मानले आहेत. “आर्टिस्ट अमित वानखेडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या साह्याने अर्कचित्र साकारल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार! आपल्या कलेला अधिक प्रोत्साहन मिळून उत्तमोत्तम कलाकृती आपल्या हातून घडोत ही सदिच्छा!”असे दिलीप वळसे पाटील यांनी लिहिले आहे.

 

 

 

Web Title :  Whimsical AI Artistry | sharad pawar to balasaheb thackeray amit wankhede made political leaders through ai photo

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा