कठुआ गॅंग रेप केस : ३ दोषींना फाशी तर ३ पोलिसांना ५ वर्षांची शिक्षा

पठाणकोट : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील कठुआ सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणात पठाणकोट सत्र न्यायालयाने तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर पुराव्यांशी छेडछाड करणाऱ्या ३ पोलिसांना ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यापुर्वी आज प्रकरणातील ७ पैकी ६ जणांना दोषी ठरविण्यात आले आहे.

कोण आहेत दोषी ?

सांजी राम – मुख्य आरोपी

परवेश कुमार – ग्राम प्रधान

दीपक खजुरिया – विशेष पोलीस अधिकारी

आनंद दत्ता – पोलीस उपनिरीक्षक

सुरेंद्र वर्मा – विशेष पोलीस अधिकारी

तिलक राज – हेड कॉन्सटेबल

कोणाला किती शिक्षा ?

दीपक खजुरिया, सांजी राम आणि परवेश कुमार या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर विशेष पोलीस अधिकारी सुरेंद्र कुमार, हेड कॉन्सटेबल तिलक राज, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सांजी निघाला मास्टरमाईंड

कठुआ प्रकरणाची सुनावणी जम्मू काश्मीरबाहेर व्हावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर जूनमध्ये याप्रकरणाची सुनावणी सुरु झाली. तेव्हा याची रेकॉर्डींग करण्यात आली. या खळबळ माजविणाऱ्या प्रकरणात सांजी राम मुख्य सुत्रधार आहे.

कोण कशासाठी दोषी ?

याप्रकरणात स्पेशल कोर्टाने ७ पैकी जणांना दोषी ठरविले आहे. त्यानंतर याप्रकरणात ३ जणांना बलात्कार आणि खूनासाठी या सर्वांना दोषी ठरविण्यात आले. तर तीन पोलिसांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.

काय आहे प्रकऱण ?

जम्मू पासून १०० किमी दूर असलेल्या कठूआ येथे मागील वर्षी जानेवारी मध्ये एका ८ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून मंदिरात तिला ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यातआले आणि तिला जीवे मारण्याआधी चार दिवस बेशुद्ध ठेवण्यात आले होते.

आरोग्य विषयक वृत्त – 

बोगस पॅथॉलॉजी लॅबकडे महापालिकांचे दुर्लक्ष

मालक तणावात असेल तर ‘कुत्रा’देखील असतो तणावात

बी. जे. महाविद्यालयात ‘पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन’ विशेष कोर्स

वैवाहिक जीवनाचा आनंद घेण्यासाठी अशी सोडवा ‘इरेक्शन’ची समस्या