अभिनंदनसोबत आलेल्या ‘त्या’ महिला कोण होत्या ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- भारताचा ढाण्या वाघ, वायूदलाचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर पाकिस्तानच्या तावडीतून सुटून, मायदेशी परतला आहे. अभिनंदन वर्धमान या विजयीवीराचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या स्वागतासाठी ढोल-ताशे, हार तुऱ्यांसह भारतीय नागरिकांनी उपस्थिती लावली होती. भारतीय भुमित आल्यापासून त्यांच्यासोबत एक महिला होती. ती महिला कोण होती असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

कोण होत्या या महिला या प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयात भारताच्या संचालक आहेत. त्यांचे नाव डॉ. फरिहा बुगती आहे. फरिहा या अभिनंदन यांच्यासोबत वाघा बॉर्डरवर आल्या होत्या. त्यांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करुन अभिनंदन यांना बीएसएफ आणि वायूसेनेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं.

अभिनंदन यांना अटक झाल्यापासून त्यांना सोडण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासोबत झालेल्या संवादात फरिहा यांची मदत झाली. हा सर्व संवाद फरिहा यांच्यामाध्यमातूनच पूर्ण झाला. त्याप्रमाणे सुटका झाल्यावर फरिहा यांनीच अभिनंदन यांना बीएसएफ आणि वायूसेनेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले.

दरम्यान, फरिहा या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांचेही प्रकरणही पाहत आहेत. कुलभूषण हे सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असून त्यांचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरु आहे.