काँग्रेसच्या ‘या’ आमदारावर मुलीला विकत घेऊन ‘रेप’ केल्याचा आरोप : कोर्टात चालणार केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोव्यातील काँग्रेस आमदार अतानासियो मोनसेराते यांच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी खटला चालवण्यात येणार आहे. गोव्यातील एका न्यायालयाने खटला रद्द करण्यासाठी केलेली याचिका फेटाळली आहे. २०१६ मध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप मोनसेराते यांच्यावर आहे.पीडित मुलीने सांगितले की तिला मोनसेराते यांनी ५० लाख रुपयांना विकत घेतले आणि लैंगिक छळ केला. लैंगिक छळाच्या आगोदर मुलीला ड्रग्स देखील देण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

२०१६ मध्ये पहिल्यांदा त्यांना अटक करण्यात आली होती त्यावेळी त्यांना ८ दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आले होते. आता १२ जून रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार आहे. आरोपीला पॉक्सो अॅक्ट  अंतर्गत खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. हे प्रकरण पहिल्यांदा समोर आल्यानंतर त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना म्हटले होते कि, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप मला टार्गेट करत आहे. मोनसेराते यांनी या वर्षी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दरम्यान, युनाइटेड गोवा डेमोक्रेटिक पार्टीपासून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात करणाऱ्या या आमदाराला पक्ष बदलू आमदार म्हणून ओळखले जाते.