अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अख्ख्या कुटुंबला बेड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या कुटुंबातील ४ जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ४९ पाकीटांमधून ५९९ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे.

हुसेन कादर शेख (वय २८), कादर अब्दुल शेख (वय ६१), मुमताज कादर शेख (वय, ४८), जबीन हुसेन शेख (वय २३ , सर्व रा. मदर तेरेसा स्कूल जवळ, गलांडे नगर, वडगाव शेरी) अशी अटक करण्यात आली आहे.

वडगाव शेरी येथे एका कुटुंबातील व्यक्ती गांजा विकत असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने वडगाव शेरी येथे छापा टाकून एकाच कुटुंबातील ४ जणांना अटक केली. तर त्यांच्याकडून गांजाची एकूण ४९ पाकिटं जप्त केली. दरम्यान याचे वजन ५९९ ग्रॅम आहे. तर ८ हजार ९८५ रुपये किंमत आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आय़ुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक सतीश वाळके, महिला सहायक पोलीस निरीक्षक अनिता खेडकर, कर्मचारी शिवाजी रोहिगुडे, जितेंद्र तुपे, महिला पोलीस हवालदार कविता नलावडे, सुधीर इंगळे, राहूल सकट, शंकर संपते यांच्या पथकाने केली.