11 वी ची प्रवेशप्रक्रिया का पूर्ण झाली नाही ?, HC चा सवाल, तातडीने भूमिका स्पष्ट करण्याचे सरकारला आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शैक्षणिक वर्ष निम्मे उलटून गेले तरी अद्यापही 11 वीची प्रवेशप्रक्रिया ( 11th Entrance Process) पूर्ण का झाली नाही, असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला (This question has been asked by the High Court to the state government) आहे. याबाबत तातडीने आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश बुधवारी (दि. 25) न्यायालयाने सरकारला दिले आहेत. अडीच महिने अकरावीची प्रवेशप्रक्रिया का थांबविली, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला केला आहे.

पेशाने वकील असलेले विशाल सक्सेना यांच्या मुलीला अद्यापही 11 वीत प्रवेश मिळाल नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर उत्तर देताना अतिरिक्त सरकारी वकील गीता शास्त्री यांनी राज्य सरकार याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे न्यायालयाला सांगितले आहे.

11 वीच्या प्रवेशप्रक्रियेला उशीर झाल्याने सक्सेना यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.11 वी प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने लवकर धोरण आखावे. कारण विद्यार्थी, पालकांना आधीच कोरोनामुळे त्रास सहन करावा लागला आहे, असे सक्सेना यांनी म्हटले होते.

या याचिकेवर पहिल्यांदा 27 ऑक्टोबर व त्यानंतर 9 नोव्हेंबरला सुनावणी झाली. तरी अद्याप सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही, असे म्हणत न्यायालयाने सरकारला प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत, तर सुनावणीदरम्यान शास्त्री यांनी न्यायालयाला सांगितले की, 11 वीची प्रवेशप्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसली तरी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. त्यावर सक्सेना यांनी राज्य सरकारचा हा दावा खोटा असल्याचे न्यायालयाला सांगितले. कोणतेही ऑनलाइन क्लासेस सुरू नसल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

You might also like