बॉलिवूड स्टार्स का बदलत आहेत प्रोफाईल फोटो ? ‘DP ला ठेवत आहेत ‘हा’ फोटो ! जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन –कोरोनाच्या या कठिण काळात अनेक बॉलिवूड कलकारांनी इतरांना मदतीचा हात दिला आहे. अनके कलाकारा असे आहेत ज्यांनी वेळोवेळी लोकांना जागरूक करण्याचंही काम केलं आहे. अशातच आता कोरोना वॉरियर्स म्हणजेच पोलिसांचे आभार मानण्यासाठी ते सध्या सोशल मीडियावर प्रोफाईल फोटो बदलताना दिसत आहे.

अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला फोटो बदलून पोलिसांचा लोगो ठेवला आहे. यातून त्यांनी पोलिसांना त्यांच्या कामासाठी व हिमतीसाठी सलाम केला आहे. सलमान खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, कॅटरीना कैफ, रितेश देशमुख अजय देवगण अशा कलाकारांनी आपला डीपी बदलला आहे.

काही स्टार्स असे आहेत ज्यांनी लोकांना सांगून असं पाऊल टाकलं आहे. मात्र काही स्टार्स आहेत ज्यांनी कोणत्याही चाहत्यांना काहीही न सांगता थेट डीपी बदलला आहे. अक्षय कुमारनं फोटो बदलण्यासोबतच एक ट्विटही केलं आहे. अक्षयनं लिहलं की, मी रोज फ्रंटलाईन वर्कर्सच्या बहादुरी बद्दल ऐकत आहे. आपला थकवा आणि भीती बाजूला सारत ते आपल्याल प्राथमिकता देत आहेत. यापैकीच एक हिरो आहे तो म्हणजे महाराष्ट्र पोलीस. मी त्यांना सलाम करण्यासाठी माझा फोटो बदलत आहे. तुम्हीही जॉईन करा आणि त्यांना मनापासून सेल्युट करा.”

https://twitter.com/karanjohar/status/1259339290078638081