अनैतिक संबंधातून पत्नीने पतीवर सपासप वार करून केला खून

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर परिसरात पतीचे दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधाची माहिती समजल्याने पत्नीने पतीवर चाकूने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेच्या वेळी घरामध्ये आई, वडील, आजी घरामध्ये हजर होते. पोलिसांना सुरुवातीला तपासात अडचणी आल्याने त्यांनी कुटुंबातील सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली. ही घटना गाला नगर परिसरातील ओम तुलसी अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी/02 मध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली.

सुनील आनंदा कदम (वय -३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सुनील याचे काम करत असलेल्या कंपनीमधील प्रणाली (वय-३४) या महिलेसोबत प्रेमप्रकरण होते. घरच्यांनी त्या दोघांचे २०११ मध्ये लग्न लावून दिले होते. लग्नानंतर सहा व एक वर्षाच्या दोन मुली आई-वडील, आजी या परिवारासोबत ते रहात होते. मंगळवारी रात्री दोघांमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास सुनीलच्या पत्नीने त्याच्या मानेवर, छातीवर आणि पोटावर सपासप वार केले. जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. पतीचा खून केल्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा बनाव रचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. दरम्यान, घरातील सर्वजण असताना खून कोणी केला हे याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. अखेर सर्वांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान पत्नीने पतीचे विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळेच त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like