मारेकरी ‘माझ्या नवऱ्याची बायको’, पहिलीचा दुसरीवर ‘आरोप’

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – महिलेने पतीच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना अंबड तालुक्यातील महाकाळ येथे आज (सोमवार) पहाटे घडली. या खून प्रकरणाला आता वेगळेच वळण लागले आहे. खून झालेल्या व्यक्तीचे दोन लग्न झाले असून पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीवर खुनाचा आरोप केला आहे.

माणिक जिजा मुळे (वय-६०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
माणिक मुळे यांचे दोन विवाह झाले आहेत. त्यांची पहिली पत्नी सत्यभामा ही माहेरी गेली होती. तर दुसरी पत्नी शारदा ही घरी होती. सोमवारी पहाटे शारदा आपल्या पतीला कोणीतरी मारत असल्याचे सांगत गावचे पोलीस पाटील राजेंद्र कव्हाळे यांच्याकडे गेली. पोलीस पाटील आणि गावकरी घरी आले असता माणिक मुळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.

या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले मात्र श्वानाला गुन्हेगाराचा मार्ग दाखवता आला नाही. पोलिसांनी घरचे दरवाजे, कड्या तुटलेल्या दिसल्याने हा बनाव असल्याच्या संशयावरून पोलिसांनी शारदाला ताब्यात घेतले. दरम्यान आपल्या नवऱ्याच्या दुसऱ्या पत्नीने पतीचा खून केल्याचा आरोप पहिली पत्नी सत्यभामा यांनी केला.

पोलिसांनी शारदाकडे केलेल्या सखोल चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली. प्रॉपर्टीच्या वादातून तिने हा खून केला असल्याचे तपासात उघड झाले. पहिल्या पत्नीला मुल होत नसल्याने माणीक यांनी दुसरे लग्न केले. मात्र, तिलाही मुल होत नसल्याने माणीक हे आपली संपत्ती पुतण्याच्या नावावर करणार होते. पुढील तपास गोंदी पोलीस करीत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like