महाराष्ट्र : तिनं अश्लील चित्रफित दाखवून पतीचे हात खुर्चीला बांधून ठेवले शरीरसंबंध, नंतर केला गळा चिरून खून

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  दोन दिवसापूर्वी नागपुरात झालेल्या एका सफाई कर्मचाऱ्याच्या खूनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या दोन वर्षापासून विभक्त राहणाऱ्या त्याच्या 5 व्या पत्नीनेच कौटुंबिक वादातून त्याचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीला खुर्चीला हात बांधून शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्यानंतर गळा चिरून त्याची हत्या केल्याची कबुली पत्नीने दिली आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी पत्नीला अटक केली आहे.

स्वाती नरेंद्र पाचपोहोरला (वय 31) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर लक्ष्मण रामलाल मलिक (वय 65) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मलिक हा एका कंपनीच्या ऑफिसमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. ऑफिस बंद झाल्यानंतर तो तिथेच राहत होता. दोन दिवसापूर्वी कंपनीतच त्याची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असता त्याच्या पत्नीनेच त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. लक्ष्मण हा स्वातीचा दुसरा पती होता. त्याच्यापासून तिला 6 वर्षांचा मुलगा आहे. दोन वर्षांपासून तो तिच्यापासून वेगळा राहत होता. सोमवारी रात्री स्वाती तिथे आली. त्यानंतर पतीला अश्लील चित्रफित दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यासाठी पतीचे हात खुर्चीला बांधले आणि चाकूने गळा कापला.

या प्रकरणी पोलिसांनी 100 पेक्षा अधिक लोकांची चौकशी केली. पण स्वातीच्या जबाबात सत्यता दिसत नसल्याने कसून चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. आरोपी पत्नीला 3 महिन्यांपूर्वी एक मुलगी झाली आहे. त्यामुळे पती तिच्यावर संशय घेत होता. तिचे एका स्कूल बसचालकासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला मिळाली होती. तेंव्हापासून तो तिच्याकडे पहिल्या मुलाचा ताबा मागत होता. तिने त्याच्या निवृत्तीवेतन खात्याचे एटीएम कार्डही ठेवून घेतल्याने दोघात वाद होता. या वादातूनच तिने पतीचा कायमचाच काटा काढण्याचे ठरवून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.