सेक्सला नकार दिल्यामुळे नराधमाने पत्नीसह दोन मुलांना जीवंत जाळले

सलेम (तामिळनाडू) : वृत्तसंस्था

पत्नीने सेक्स करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीसह दोन लहान मुलांना जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना सालेमच्या अट्टूरजवळील अझगापूरम येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. गंभीर झालेल्या पत्नीने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिलेल्या साक्षीमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी नराधम पतीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1deff94f-bf13-11e8-891c-7f23ae5a177d’]

सलेमच्या अट्टूरजवळील अझगापूरम येथे हे कुटुंब राहतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक हा दारुडा असून तो रोज त्याचे पत्नी पुमंतीबरोबर वाद होत असत. तिला मारहाणही करायचा. मंगळवारीही तो दारुच्या नशेत घरी आला होता. त्याने पुमंतीकडे सेक्सची मागणी केली. तिने नकार दिल्याने त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतप्त कार्तिकने पुमंतीसह मुलगी नीला (वय ५) आणि पूर्वरसन (वय ६) यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना आगीच्या हवाली केले. त्यामुळे हे तिघेही जण जोरजोरात ओरडल्याने शेजाऱ्यांनी धाव घेऊन आग विझवली आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’46fba1de-bf13-11e8-917b-17e098f7e817′]

या आगीत ८० टक्के भाजल्याने पुमंती आणि तिची मुलगी नीला यांचा मृत्यू झाला आहे. तर मुलगा पूर्वरसनची तब्येत गंभीर असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, मृत्यूपूर्वी पुमंतीने कार्तिकनेच आम्हा तिघांना पेटवून दिल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी कार्तिकला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

खासदारांनी कापला वाढदिवशी संसदेच्या प्रतिकृतीचा केक