स्वत:वर हल्ला करून घेतलेल्या भाजपा खासदाराच्या मुलाच्या पत्नीने केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाली…

लखनौ : पोलीसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुषने स्वत:वर गोळी झाडून घेतल्याने खळबळ उडाली होती. जखमी आयुषवर रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र तिथून तो फरार झाला. दरम्यान, आयुषच्या पत्नीने मोठा गौप्यस्फोट केला आहे. आयुषने कुणाला तरी फसवण्यासाठी हे संपूर्ण कारस्थान रचल्याचा दावा तिने केले आहे. तसेच तो दिल्लीतील सरकारी निवासस्थानामध्ये लपून बसल्याचा तसेच खासदार वडील आपल्या मुलाला वाचवत असल्याचा दावाही तिने केला आहे.

आयुषची पत्नी म्हणाली की, माझा पती दिल्लीतील सरकारी निवासस्थानात लपून बसला आहे. माझे आयुषशी फोनवर बोलणे झाले आहे. त्याची कॉल रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. आयुष आर्थिक अडचणींचा सामना करत होता. व्यावहारिक देवाण-घेवाणीवरून त्याचे चंदन गुप्ता नावाच्या व्यापाऱ्यासोबत वाद झाला होता. त्यालाच फसवण्यासाठी त्याने हे कारस्थान रचल्याचा दावा, आयुषच्या पत्नीने केला. फरार झाल्यानंतर आयुष लखनौमध्ये खासदार असलेल्या वडलांच्या घरी लपला होता. त्यानंतर आता तो खासदार निवासामध्ये राहत आहे. दरम्यान, कुटुंबीयांकडून येत असलेल्या दबावामुळे आय़ुष मला सोडत आहे. त्याचावरोधात साक्ष दिल्यास तो माझी साथ देणार नाही. आमचे वैवाहिक जीवन सामान्य नव्हते. या विवाहासाठी आयुषचे कुटुंबीय तयार नव्हते. तसेच आम्हा दोघांमध्येही काही आलबेल नाही. तो मला मारहाण करत असे, असा दावाही त्याच्या पत्नीने केला आहे.