…तर 7 दिवसांसाठी वाहतूक सेवा बंद करु, विमान कंपन्यांचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनातही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी विमान प्रवासात सोशल डिस्टन्सचे उल्लंघन केल्यामुळे 7 दिवसांसाठी वाहतूक बंद करू असा इशारा विमान कंपन्यांनी दिला आहे. अभिनेत्री कंगना रणौत जेव्हा चंदिगडवरून मुंबईला आली त्यावेळी विमानात नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर सर्व विमान कंपन्यांना पत्र पाठवून इशारा दिला आहे.

कोविड नियमांचे उल्लंघन करणार्‍या प्रवाशांवर तात्काळ कारवाई करावी अशी सूचनाही डीजीसीएने केली आहे. कंगनाने 9 सप्टेंबरला इंडिगोच्या 6ए264 या फ्लाईटने चंदिगडहून मुंबईला प्रवास केला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन केले नव्हते. त्यामुळे डीजीसीएने नव्याने पत्र पाठवले आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा प्रवासासाठी कडक नियम केले आहेत. त्यामुळे त्या नियमांचं उल्लंघन करू नका आणि प्रवाशांनाही करू देऊ नका असे पत्र डीजीसीएने सर्व विमान कंपन्यांना बजावले आहे.