Winter Ear Pain | हिवाळ्यातच का होते कानदुखीची समस्या? एक्सपर्टकडून जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : Winter Ear Pain | भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडी झपाट्याने वाढत आहे. या ऋतूमध्ये आरोग्याच्या समस्या वाढतात. सर्व वयोगटातील लोक त्रस्त असतात. कानाशी निगडीत संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अनेकांना कानाच्या आत आणि बाहेर इन्फेक्शन होते. बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे कानाला सूज येऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, थंडीच्या मोसमात कानाच्या संसर्गामुळे अनेक रुग्ण उपचार घेतात. (Winter Ear Pain)

कानाला सूज सामान्यतः बॅक्टेरिया किंवा व्हायरसमुळे होते, ज्यामुळे कानांचे नुकसान होऊ शकते. थंडीत इम्युनिटी कमकुवत होणे हे देखील कानांत सूज येण्याचे एक कारण आहे.

तज्ज्ञांच्या मते, जर सायनुसायटिसचा उपचार केला नाही तर त्यामुळे कानाची समस्या उद्भवू शकते. कारण कानाचे संक्रमण नाक आणि घशाच्या संसर्गाशी निगडीत आहे. हिवाळ्यात, कान जास्त कोरडे झाल्यामुळे आणि अ‍ॅलर्जीक रायनायटिसमुळे कानात संक्रमण होते. थंडीमुळेही कान दुखतात. थंडीच्या महिन्यात रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे कानाचे संक्रमण वाढू शकते. (Winter Ear Pain)

ईएनटी सर्जन सांगतात की कानात संसर्ग, कानात दुखणे, चक्कर येणे, डोकेदुखी, सूज, असामान्य स्त्राव आणि
तात्पुरती श्रवणशक्ती कमी होणे ही कानाच्या संसर्गाची लक्षणे आहेत. थंड हवेच्या संपर्कात आल्यावर कान दुखणे वाढू शकते.
त्यावर लवकर उपचार करा. कानात संसर्ग झाल्यास ड्रॉपचा वापर करा. डॉक्टरांनी सांगितलेले उपचार करा.
डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर अँटीबायोटिक्स, अँटीहिस्टामाइन्स आणि वेदनाशामक औषधे घ्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Bharat Todkari Passed Away | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सल्लागार भारत तोडकरी यांचे निधन

वकिलांच्या फ्लॅटमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; दोघीही म्हणतात मी त्यांची सहायक

Pune Pimpri Accident News | ताम्हिणी घाटात बसला भीषण अपघात, २ महिलांचा मृत्यु, ५५ जखमी